नागपूर : अडीच वर्षे सत्तेत आपण होतो, परंतु कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे कामे झाली नाही. समितीवरील नियुक्ती किंवा दंडाधिकारी म्हणून देखील नियुक्ती देण्यात आले नाही. त्यामुळे शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. परंतु पुन्हा मलाच ही जबाबदारी सांभाळण्यास सांगितली. असे काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे म्हणाले.
काॅग्रेसच्या नागपूर शहर कार्यकारिणी बैठक आमदार निवासात शनिवारी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,अडीच वर्ष आम्ही सत्तेत होतो. परंतु पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे कामे झालीच नाही. कोणत्याही समितीवर कार्यकर्त्यांना नियुक्ती करण्यात आली नाही. ते आमचे अपयश आहे. या कारणास्तव मी राजीनामा दिला. परंतु पक्षानी पुन्हा मलाच जबाबदारी दिली. काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मूल्यांकन व्हायला पाहिजे. या मताचा आहे. आगामी नागपूर महापालिका निवडणुकीत १५६ लोंकाना उमेदवारी दयायची आहे. परंतु दीड हजारअर्ज आले आहे. म्गणून संबंधित प्रभागात लढणाऱ्या उमेदवारांनी चर्चा करुन एका वार्डातून एक व्यक्ती उमेदवार म्हणून देण्यात यावा, ज्याचा फायदा पक्षाला होईल. आगामी निवडणुकीत १५ जणांचे मंडळ करुन एक बुथ अध्यक्ष व १५ बुथचा एक वार्डाचा एक वार्ड अध्यक्ष शहरातील निरिक्षक म्हणून येणाऱ्या पदाधिकाऱ्यासमोर वार्ड अध्यक्षाची निवड करावी. १८ ब्लॉक वर १८ बी.आर.ओ नी कार्य केले. त्यानुसार काही नविन ब्लॉक अध्यक्ष व शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी नव्याने संघटनेत दिसतील. नवीन कार्यकारिणी तयार होईल. नागपूरचे डी.आर. ओ सुनील कुमार व ए.पी.आर ओ. दिनेश कुमार काही दिवसातच सविस्तर अहवाल प्रदेश काॅग्रेसला सादर करतील व प्रदेश काॅग्रेसकडून नवीन कार्यकारिणी घोषित होईल, असेही ते म्हणाले.
काँग्रेसची आझादी गौरव पदयात्रा
स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाले. त्या अनुषंगाने कॉंग्रेसने उदयपूर, राजस्थान येथील नवसंकल्प शिबिरात गैरव पदयात्रा काढण्याचे ठरले आहे. संपूर्ण राज्यभर ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान आझादी गौरव पदयात्रा यशस्वी करण्यासाठी विधानसभा निहाय समिती तयार करून नियोजनाची रुपरेषा दोन दिवसात प्रदेश काॅग्रेसला पाठविण्यात येईल, असेही ठाकरे म्हणाले.