अकोला : वसंत ॠतूतील मनमोहक बदल व विविध प्रकारच्या सण, उत्सवातून मिळणाऱ्या आनंद, उत्साहात या वेळी आकाशही सहभागी होणार आहे. वसंतात आसमंतातही मनमोहक घडामोडींचा बहर होणार असून ग्रहांची युती व अवकाश केंद्राच्या दर्शनाची पर्वणी आकाशप्रेमींना लाभणार आहे, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी शुक्र ग्रह आणि लालसर रंगाचा मंगळ ग्रह ८ मार्चला महाशिवरात्रीचे पहाटे पूर्व आकाशात चंद्रकोरी जवळ युती स्वरूपात मकर राशी समुहात बघता येतील.

हेही वाचा >>> दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ! राष्ट्रवादी काँग्रेसकडून बुलढाणा मतदारसंघाचा आढावा; राजेंद्र शिंगणे तिसऱ्यांदा मैदानात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसंतातील आसमंतात भर घालण्यासाठी जगातील सोळा देशांनी मिळून तयार केलेले आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन केंद्र आपल्या भागातून जातांना नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल. अंतराळ अभ्यास व संशोधन केंद्र प्रचंड वेगाने पृथ्वीभोवती फिरते. मुंबई ते नागपूर अंतर केवळ दोन सेकंदात ते पूर्ण करते. हा अनोखा आकाश नजारा पाच दिवसांत सात वेळा पाहता येईल. ८ मार्चला पहाटे ६.०६ वाजता, ९ ला रात्री ८.१६ वाजता, १० रोजी पहाटे सूर्योदयापूर्वी ६.०६ व रात्री ७.२८ वाजता, ११ मार्चला पहाटे ५.२०, रात्री ८.१७ वाजता आणि १२ मार्चला रात्री ७.२८ वाजताच्या सुमारे सहा मिनिटांच्या दर्शनाने या आकाश उत्सवाची सांगता होईल. सूर्याला सर्वात जवळ असलेला बुध ग्रहाचा उदय १० मार्च रोजी सूर्यास्तानंतर पश्चिमेस आणि सूर्यमालेतील सर्वात सुंदर व वललांकित असलेला शनी ग्रह १४ रोजी पहाटे पूर्व क्षितिजावर उदय होत आहे. दुर्बिणीतून याच्या मनोहारी वलय बघता येईल. मात्र काही कालावधीनंतर पृथ्वी, सूर्य व शनी ग्रह यांच्या स्थितीतील बदलामुळे असा अनुपम आकाश नजारा बघता येणार नाही. आकाश प्रेमींनी या अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले आहे.