शहरातील नऊ रुग्णांचा समावेश

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत एकही करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू नाही. परंतु, १२ नवीन रुग्णांची भर पडली.  दिवसभरात १३ व्यक्ती करोनामुक्त झाल्याने तीन दिवसांनी नवीन रुग्णांहून करोनामुक्त अधिक नोंदवले गेले.

करोनामुक्तांमध्ये शहरातील १३ व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ३४ हजार २७८, ग्रामीण १ लाख ४३ हजार ५४४, जिल्ह्य़ाबाहेरील ५,२१० अशी एकूण ४ लाख ८३ हजार ३२ व्यक्ती नोंदवली गेली. दिवसभरात शहरात ९, ग्रामीणला २, जिल्ह्य़ाबाहेरील १ असे एकूण १२ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ४० हजार २३३, ग्रामीण १ लाख ४६ हजार १६९, जिल्ह्य़ाबाहेरील ६,८४१ अशी एकूण ४ लाख ९३ हजार २४३ रुग्ण एवढी नोंदवली गेली. दिवसभरात जिल्ह्य़ात एकही रुग्णाचा मृत्यू नसल्याने शहरातील आजपर्यंतची मृत्यूसंख्या ५,८९३, ग्रामीण २,६०३, जिल्ह्य़ाबाहेरील १,६२४ अशी एकूण १०,१२० रुग्ण इतकी होती. दिवसभरात शहरात ३,३२९, ग्रामीणला १,३०७ अशा एकूण ४,६३६  चाचण्या झाल्या.

६८ टक्के सक्रिय रुग्ण शहरातील

गुरुवारी शहरात ६२ रुग्ण (६८.१३ टक्के), ग्रामीणला २२ रुग्ण (२४.१७ टक्के), जिल्ह्य़ाबाहेरील ७ रुग्ण (७.७ टक्के) असे एकूण ९१ सक्रिय रुग्ण होते. यापैकी १२ नवीन रुग्णांना विविध कोविड केअर सेंटर वा कोविड रुग्णालयांत दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, तर ७९ दाखल रुग्णांवर उपचार सुरू होते.

सहा जिल्ह्य़ांत एकही नवीन रुग्ण नाही

विदर्भात २४ तासांत करोनाचा एकही मृत्यू नाही. परंतु २८ नवीन रुग्णांची भर पडली. सहा जिल्ह्य़ांत मात्र एकही नवीन रुग्ण आढळला नाही. नवीन रुग्ण नसलेल्या जिल्ह्य़ांत चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, वर्धा या सहा जिल्ह्य़ांचा समावेश आहे. नागपुरात १२, अमरावतीला २, गडचिरोलीत ४, वाशिमला ४, अकोलात ६ रुग्णांची भर पडली.