लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने सदर परिसरातील ब्रदर्स कॅफे नावाच्या हुक्का पार्लरवर छापा घातला. संचालक आणि व्यवस्थापकासह दोन लोकांना ताब्यात घेण्यात आले. ईश्वर नरेश सुलभेवार (२२) रा. मॉडेल मिल चौक आणि भूषण अशोक गोंडाणे (२७) रा. सोमवारी क्वॉर्टर, अशी आरोपींची नावे आहेत.

आणखी वाचा-बँका उघडण्याचा मुद्दा… भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीचे स्मरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्रदर्स कॅफेमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून बुधवारी रात्री पोलिसांनी कॅफेमध्ये धाड टाकली. यावेळी वेगवेगळ्या टेबलवर काही तरुण हुक्का पिताना आढळले. पोलिसांनी ईश्वर आणि भूषण विरुद्ध गुन्हा नोंदविला तसेच पार्लरमधून हुक्का पॉट, फ्लेव्हर आणि इतर साहित्यांसह ३० हजार रुपयांचा माल जप्त केला. या परिसरात अनेक ठिकाणी हुक्का पार्लर सुरु असून तेथे तरुण-तरुणींना ड्रग्स आणि गांजा पुरविण्यात येते. तसेच सदर पोलिसातील एका कर्मचाऱ्याच्या आशीर्वादाने संचालक काही हुक्का पार्लरमध्ये दारुचीही सोय करून दे त असल्याची माहिती आहे.