बुलढाणा : लोणार तालुक्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नदी नाले एक झाले आहे. किनगाव जट्टू येथील अरुंद पुलावरून वेगाने पुराचे लोंढे वाहून जात असतानाही शेकडो ग्रामस्थ जीव मुठीत धरून हा पूल पार करीत असल्याचे थरारक चित्र आहे…

बुलढाणा जिल्ह्यात तब्बल एक दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर गेल्या दोन तीन दिवसापासून ठीक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. लोणार तालुक्यात तीन दिवसापासून कोसळधार पडत आहे. पहिल्याच दिवशी नाल्याला आलेल्या पुरात तिघा इसमासह बैलगाडी वाहून गेली. आज तालुक्यातील खापरखेड ते किनगाव जट्टू दरम्यानच्या पुलावरून पुराचे पाणी ओसंडून वाहत आहे. मात्र दुसरा मार्ग नसल्याने या पाण्यातून प्रवाशी, विध्यार्थी, शेतमजूर, शेतकरी धोकादायक पद्धतीने व जीवाचा धोका पत्करून पूल पार करीत आहे. पुराच्या पाण्यातून नागरिकांना अक्षरशः जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

किनगाव जट्टू येथील अरुंद पुलावरून वेगाने पुराचे लोंढे वाहून जात असतानाही शेकडो ग्रामस्थ जीव मुठीत धरून हा पूल पार करीत असल्याचे थरारक चित्र आहे.

हेही वाचा >>>“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील”, बावनकुळेंनी केले स्पष्ट; म्हणाले, “राष्ट्रवादीमुळे भाजपात अस्वस्थता नाही”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू ते खापरखेड या मुख्य मार्गावर असलेल्या नारळी नदीचा पूल कमी उंचीचा आहे. त्यामुळे थोड्या पावसातच या पुलावरून नेहमीच पाणी वाहत असते. दरम्यान कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीला मोठा पूर आला आहे. पुल उंच करण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे. किमान आजचा व्हिडीओ पाहून तरी नेत्यानी या मागणीवर कारवाई करावी अशी अपेक्षा आहे.