धोकादायक वळण, माहिती फलकाअभावी अपघाताचा धोका

देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर जिल्ह्य़ाचा विकास झपाटय़ाने होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर मोहिते यांनी उपाय सुचविले

नागपूर : देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर जिल्ह्य़ाचा विकास झपाटय़ाने होत आहे. हा विकास सुरू असतानाच आजही जिल्ह्य़ात अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागतात. या अपघाताबाबत लोकप्रतिनिधीकडून समर्थन व बरीच टीकाही केली जाते. परंतु सामाजिक कार्यकर्ते व संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य चंद्रशेखर मोहिते यांनी मात्र वैयक्तिक स्तरावर या सर्व स्थळांचा अभ्यास करत ते दूर करण्यासाठीच्या उपाययोजना संबंधित समितीसह पोलिसांनाही सुचवल्या आहेत.

हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील विहीरगाव पुलाजवळ दोन्ही बाजूला २०० मीटर अंतरावर अपघात प्रणव स्थळ आहे. येथे वळण असलेले फलक दोन्ही बाजूला लावण्यासह शाळा/ कॉलेज दर्शवणारे फलक, रस्त्यावर स्पिड ब्रेकर लावून पांढऱ्या रंगाचे पट्टे लावणे, पुलाजवळ प्रकाशाची व्यवस्था करण्याचे सुचवले आहे. सोनेगाव पोलीस ठाणे हद्दीत महेश ढाबाजवळ सव्‍‌र्हिस रोडकडे जाणाऱ्या रस्ता कटिंगजवळ दोन्ही बाजूला ब्लिंकर लावणे आवश्यक आहे. येथे वेगमर्यादा फलक

लावून त्याची कडक अंमलबजावणीची गरज आहे. मानेवाडा चौकात शाळा व वस्ती असतानाही ते दर्शवणारे फलक नसल्याने ते लावावे, गती मर्यादा निश्चित करून त्याची अंमलबजावणी, झेब्रा क्रॉसिंग, पेट्रोलपंपावर कुणीही चुकीच्या दिशेने येऊ नये म्हणून काळजी आवश्यक आहे.

म्हाळगीनगर चौकावर हुडकेश्वर पिपळा रोडवरील डिवायडर अरूंद असल्याने वाहनचालक दुसऱ्या बाजूने चुकीने वाहन काढतात. त्यामुळे या डिवायडरची लांबी वाढवणे आवश्यक आहे. येथील खड्डे बुजवणे आवश्यक आहे. गजानन शाळेजवळ तातडीने सिग्नल दुरुस्ती, चौकातील डिवायडरचे काम पूर्ण करणे, अपघातप्रवण स्थळाचे फलक लावणे आवश्यक आहे. शताब्दी चौक, दिघोरी चामट चक्की चौक, नरेंद्रनगर चौक, वाठोडा चौक, शीतला माता चौक, खरबी चौक, जुना पारडी नाका चौक, प्रकाश हायस्कूल ते कापसी उड्डाणपूल, चिखली चौक, दिघोरी टेलिफोन चौक, कबाडी दुकानासमोर सक्करदरा, हनुमान मंदिर पारडीसह इतरही बऱ्याच भागातील विविध त्रुटी पुढे आणून मोहिते यांनी सजग नागरिक म्हणून पोलीस प्रशासनासह संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीला तातडीने उपाययोजना सुचवल्या असून त्यांचे पालन केल्यास अपघातावर नियंत्रण शक्य असल्याचा दावा केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dangerous turn information board accident ssh