scorecardresearch

रेल्वे मालगाडीच्या इंजिनवर आढळला बिबट्याचा मृतदेह; वन व रेल्वे खात्यात खळबळ

मालगाडीच्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने वन खाते तथा घुग्घुस रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे.

dead body of a leopard was found on the engine of a railway
मालगाडीच्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह ( Image – लोकसत्ता टीम )

चंद्रपूर : धुलीवंदनाच्या दिवशी (७ मार्च) सकाळी ७ वाजताच्या सुमारास घुग्घुस येथील वैकोली वणी कोळसा खाण परिसरातील न्यू कोल रेल्वे साईडिंग येथे चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रातून रेल्वे मालगाडीचे इंजिन आले. या मालगाडीच्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने वन खाते तथा घुग्घुस रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – पुरुषांना पारंपरिक फेटा, महिलांना नऊवारी अन् मेहंदी, सी-२०च्या पाहुण्यांसाठी नागपूर सज्ज

हेही वाचा – वाशीम : वादळाच्या तडाख्याने १५० वर्षांपेक्षा अधिक जुने पिंपळाचे झाड कोसळले; गहू, आंब्याचे नुकसान

या घटनेसंदर्भात घुग्घुस रेल्वे स्थानकाचे अधिकारी राजेश सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी सात वाजता चंद्रपूर येथील महाऔष्णिक वीज केंद्रातून मालगाडी आली, त्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह दिसला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या हाय टेन्शन इलेक्ट्रिक वायरच्या कचाट्यात येऊन या बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. चंद्रपूरचे महाऔष्णिक वीज केंद्र ताडोबाच्या जंगलाला लागून आहे. येथे वाघ, बिबट्यासह अस्वल व इतर अनेक प्रकारचे वन्य प्राणी वावरत असतात. महाऔष्णिक वीज परिसरातही वाघ, बिबट्या व अस्वलाचे वास्तव्य आहे. याआधीही महाऔष्णिक वीज केंद्र परिसरातील जंगलात अनेक वन्य प्राणी दिसले होते. मृत बिबट त्यापैकीच एक असावा, असा अंदाज आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 14:14 IST
ताज्या बातम्या