भंडारा : भंडाऱ्यातील जवाहरनगरच्या आयुध निर्माणी कारखान्यामध्ये एलटीपीई २३ (लो टेंपरेचर प्लास्टिक एक्यूपमेंट) विभागात भीषण स्फोट झाल्याची घटना २४ जानेवारी रोजी घडली आहे. या दुर्दैवी घटनेत ८ कर्मचाऱ्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये एक प्रशिक्षणार्थी आहे तर जखमींमध्ये सुध्दा एक प्रशिक्षणार्थी आहे. हा स्फोट ज्या एलटीपीई २३ विभागात गोळा बारुद बनविण्याचे काम होते त्यामुळे अशा अतिसंवेदशील विभागात प्रशिक्षणार्थीना काम करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी बळजबरी करीत असल्याची धक्कादायक माहिती आयुध निर्माणी कारखान्यात कार्यरत प्रशिक्षणार्थ्याने ‘लोकसत्ताशी’ बोलताना दिली. आयुध निर्माण कंपनीच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

भंडारा शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर साहुली गावाजवळ आयुध निर्माण कंपनी आहे. हजारावर कामगार तिथे वेगवेगळ्या सेक्शनमध्ये आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतात. येथे अत्यंत उच्च दर्जाची स्फोटके तयार केली जातात. या कारखान्यात एचएमएक्स आणि आरडीएक्स सारखे साहित्य तयार केले जाते, ज्याचा वापर शेवटी दारूगोळा भरण्यासाठी केला जातो. हा कारखाना पुणे-मुख्यालय असलेल्या म्युनिशन्स इंडिया लिमिटेडच्या अंतर्गत येतो.

labour iron rod pune news
मजुराच्या खांद्यातून सळई आरपार, एरंडवणे भागात दुर्घटना; अग्निशमन दलाकडून तातडीने मदतकार्य
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
pune police
पुण्यात दहशत माजवणाऱ्यांना पुणे पोलिसांनी दाखवला इंगा! गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांची रस्त्यावरून काढली धिंड, Video Viral
BMC Budget 2025 Live Updates
कचरा संकलन शुल्काचा मुंबईकरांवर भार? महापालिकेचा आज अर्थसंकल्प
Bmc to buy dust control equipment
धुळीची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिका अद्ययावत यंत्रे खरेदी करणार
Chemicals are now used to eliminate mosquitoes in vasai
वसई : डास निर्मूलनासाठी आता रसायनाचा वापर, डासांचा प्रभाव असलेली ९९ ठिकाणी निश्चित
Three people have been arrested in connection with drug smuggling and production.
सांगलीत मेफेड्रोन उत्पादन करणारा कारखाना उद्ध्वस्त, ३० कोटींचा साठा जप्त, तिघांना अटक
mumbai railway 2006 blast case Appeal Against Conviction bombay high court
मुंबई उपनगरीय लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : दोषसिद्ध आरोपींच्या उच्च न्यायालयातील अपिलावरील सुनावणी पूर्ण

या कारखान्याच्या कमी तापमानाच्या प्लास्टिक स्फोटक निर्मिती युनिटमध्ये २४ जानेवारी रोजी भीषण स्फोट झाला. ज्यात ८ जणांचा बळी गेला तर ५ जण मृत्यूशी झुंज देत आहेत. मृतांमध्ये २० वर्षांचा अंकित बारई नावाच्या शिकाऊ विद्यार्थ्यांचाही नाहक बळी गेला. तर सुनील कुमार यादव या शिकाऊ विद्यार्थि गंभीर जखमी आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले असून एलटीपीई सारख्या अती संवेदनशील विभागात शिकाऊ विद्यार्थ्यांना कुणी काम करण्यास सांगितले असा प्रश्न उपस्थित झाला.

कंपनीतील एका शिकाऊ विद्यार्थ्यांने सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार याबाबत निवेदन देऊन प्रशिक्षणार्थीना अशा विभागात कामासाठी पाठवू नये असे सांगण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांकडून या प्रशिक्षणार्थींना कायम दबावात ठेवण्यात येत होते. कुणी विरोध केला तर ‘ काम करायचे असेल तर करा नाही तर नोकरी सोडून द्या ‘ असे उर्मटपणे सांगितले जायचे. त्यामुळे नाईलाजास्तव या प्रशिक्षणार्थींना येथे काम करावे लागत होते.

जीएम कार्यालयासमोर आंदोलन…

२० वर्षीय अंकित बारई या प्रशिक्षणार्थीचा नाहक बळी गेल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक कर्मचारी, प्रशिक्षणार्थी यांनी रात्री उशिरा साहुली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरीष्ठ अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी केली असून आज सकाळ पासून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अंकित बारई याला न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलन पेटले आहे.

मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये…

सुरक्षा नियमांना जे लोक बगल देतात, जी कुणी अथॉरिटी असेल, त्यावर मनुष्य वधाचा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये. हे सर्व फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत निकाली काढावीत, जनसामान्य किंवा प्रशासन केवळ मुकदर्शी आणि संवेदना हीन झालेले आहेत, घटनेची सखोल चौकशी झाली पहिजे जेणेकरून पुन्हा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये. प्रवीण उदापुरे, माजी सिनेट सदस्य…

Story img Loader