scorecardresearch

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गुराख्याचा मृत्यू

मृताच्या कुटुंबीयांना वनविभागाने ५० हजार रुपयांची तातडीची मदत केली आहे.

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गुराख्याचा मृत्यू
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार

चंद्रपूर : मूल तालुक्यातील काटवन जंगलाच्या कक्ष क्रमांक ७७३ मध्ये वाघाने केलेल्या हल्ल्यात गुराखी जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली होती. जखमी गुराख्याचा आज, गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. भाऊराव वतू गेडाम (५५ रा. काटवण) असे मृताचे नाव आहे. मूल तालुक्यातील काटवण हे गाव बफर क्षेत्रात येते. गावाला लागूनच जंगलव्याप्त परिसर आहे.

भाऊराव गेडाम यांच्यासह दोन गुराखी मारोडा बिटातील काटवण येथील कक्ष क्रमांक ७७३ मध्ये गेले होते. दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने गेडाम यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे पाठवण्यात आले. गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांना वनविभागाने ५० हजार रुपयांची तातडीची मदत केली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या