चंद्रपूर: वाघिणीपासून दुरावलेल्या पाच महिन्याच्या बछड्याचा शनिवारी ताडोबातील वन्यजीव उपचार केंद्रात मृत्यू झाला. या बछड्याने वाघिणीपासून दुरावल्यानंतर अन्नपाणी सोडले होते. शनिवारी त्याला नागपूर येथे हलविण्यात येत असतानाच मृत्यूने गाठले.
तीन दिवसांपूर्वी बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघिणीपासून दुरावलेल्या दोन वाघांच्या बछड्यांचा मृत्यू झाला होता, तर तिसरा पाच महिन्याचा बछडा गंभीर स्थितीत होता. त्याचेवर ताडोबातील वन्यजीव उपचार केंद्रात उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी त्याचाही मृत्यू झाला. दरम्यान, तीन दिवसांपासून वाघिणदेखील बेपत्ता आहे. तिच्या शोधार्थ वनपथक तथा ‘कॅमेरा ट्रॅप’ जंगलात लावण्यात आले आहे. मात्र, अजूनही वाघिणीचा शोध लागलेला नाही.