वर्धा: केळझर येथे बुध्द विहार परिसरात आढळून आलेली १३ व्या शतकातील यादवकालीन वृषभनाथ महाराजांची कोरीव मूर्ती केंद्रीय पुरातत्व विभागाकडून सोपविण्याचा निर्णय सा घेण्यात आला. बुद्ध विहारच्या मालकीच्या शेतात ही मूर्ती आढळून आली होती. पण ती इतरत्र हलविण्यास गावकरी मंडळींनी विरोध केला होता. त्यानंतर विहाराच्या विश्वस्त मंडळी सोबत प्रशासन व पुरातत्व विभाग अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात सर्वांनी एकमते निर्णय घेतला. त्यानुसार ही मूर्ती केंद्रीय पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्याचे ठरले.

कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर मूर्ती नागपूरला पाठविण्यात आली आहे. मूर्ती सापडल्यानंतर चांगलाच तणाव निर्माण झाला होता. विहारातील अनुयायी तसेच गावकरी ही मूर्ती अन्य ठिकाणी देण्यास तयार नव्हते. त्यांना सेलू तहसीलदार डॉ.स्वप्नील सोनवणे , ठाणेदार तिरुपती राणे आदींनी मध्यस्थी करीत शांत केले. बुद्ध विहाराचे अध्यक्ष के.झेड. वाघमारे यांनी स्वतः हजर होत अधिकारी वर्गाशी चर्चा केली. तेव्हाच पुढील कायदेशीर सोपस्कार पार पडले.

हेही वाचा… १३ व्या शतकातील पाषाण मूर्ती बुद्ध विहारात आढळली; पाच फूट लांब, ४४ सेंटिमीटर रुंद व दीड फूट जाड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिव्य अश्या या पाषाण मूर्तीस मग नागपूरला नेण्याची कार्यवाही सुरू झाली. केळझर हे ठिकाण महाभारतकालीन असल्याची मान्यता आहे. या ठिकाणी तत्कालीन नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभाग चमूने बरेच संशोधन केले.पुरातत्व विभागाने उत्खनन करीत मुर्त्या उजेडात आणल्या. काही महिन्यांपूर्वी एक निद्रावस्थेत असलेली मूर्ती जैन बांधवांनी रामटेक येथे नेल्याचे विहारचे स्वयंसेवक सांगतात. केवळ विहार परिसरच नव्हे तर अन्य भागात पण प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत.संशोधकांना हा परिसर नेहमी अभ्यासासाठी खुणावत असतो.