scorecardresearch

नागपुरातील सी-२० साठी आलेले प्रतिनिधी पारंपारिक स्वागताने भारावले

नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती.

C20 Delegates Grand traditional welcome
सी-२० परिषदेसाठी विविध देशातील प्रतिनिधींचे विमानतळावर पांरपारिक पद्धतीने स्वागत

नागपूर: सोमवारपासून सुरू होणाऱ्या सी-२० परिषदेसाठी विविध देशातील प्रतिनिधींचे आगमन रविवारी दुपारपासूनच सुरू झाले .सांयकाळी सी-२० च्या अध्यक्ष व अध्यात्मिक नेत्या अध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी यांचे आगमन झाले. त्यांचे विमानतळावर पांरपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. स्वागताने विदेशी भारावून गेले होते. दरम्यान रविवारी झालेल्या पावसाने आयोजकांची चिंता वाढली आहे. सोमवारीही हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हेही वाचा >>> ‘एसटी’ महिलांनी ‘हाऊस फुल्ल’, महामंडळाला घसघशीत उत्पन्न

सोमवारपासून नागपुरात सी-२० परिषद सुरू होणार आहे. त्यासाठी देश-विदेशातील सुमारे ३०० हून अधिक प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये दोन दिवस परिषद चालणार असून २२ तारखेला प्रतिनिधी नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प व इतर प्रसिद्ध स्थळांना भेटी देणार आहेत. रविवारी दुपारपासून प्रतिनिधींचे नागपुरात आगमन होण्यास सुरूवात झाली. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. जी-समुहातील सर्व देशांचे राष्ट्रध्वज लावण्यात आले होते. प्रतिनिधींना पंचारतीने ओवाळून, औक्षवन करून त्यांच्या ग ळात सुताचा हार घालून स्वागत केले जात होते. त्यानंतर त्यांना भगव्या रंगाचा फेटा घालण्यात येत होता. स्वागत करणाऱ्या महिला, तरुणींना पारंपारिक पोषाख घातला होता. भारतीय परंपरेच्या स्वागताने विदेशी व देशी प्रतिनिधीही भारावून गेले होते. सांयकाळी सी-२० च्या अध्यक्ष व अध्यात्मिक नेत्या अध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी यांचे आगमन झाले. त्यांचेही पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.परिषदेच्या निमित्ताने हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये ही परिषद होणार असून तेथील सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 20:56 IST