बुलढाणा : हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज फडकिवण्याची आपली मागणी अजूनही प्रलंबितच आहे. यामध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाचे पुरातन कायदे व नियम अडचण असून या मागणीसाठी लवकरच भगवा जाणीव आंदोलन छेडणार असल्याची घोषणावजा माहिती अभिनेते तथा खासदार अमोल कोल्हे यांनी येथे दिली.

 बुलढाणा शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे उद्घाटन खा. कोल्हे यांच्या हस्ते १७ फेब्रुवारीला रात्री करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती  लाभली. यापूर्वी प्रसिद्धी माध्यमासोबत बोलताना त्यांनी दोन वर्षांपासून रखडलेल्या मागणीवर प्रकाश टाकत पुरातत्वच्या जुनाट कायद्यावर नाराजी व्यक्त केली  यावेळी शिव जयंती समितीचे अध्यक्ष डॉ शोन चिंचोले, माजी अध्यक्ष सुनील सपकाळ हजर होते.

हेही वाचा >>> भाजपची काँग्रेस होईल ही भीती फडणवीस यांना का वाटते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पडद्यावर शिव- शंभुच्या भूमिका समर्थपणे साकारणाऱ्या या अभिनेत्याने सांगितले की, शिवनेरीवर भव्य भगवा ध्वज लावण्यात यावा ही आपली मागणी आहे. सन २०२१ पासून आपण ही मागणी केंद्रीय मंत्री, भारतीय पुरातत्त्व खात्याकडे रेटली आहे. मात्र  पुरातत्वचे ब्रिटिशकालीन कायदे यासाठी आडकाठी ठरत आहे. केंद्रीय मंत्र्यांनी देखील याच अडचणीवर बोट ठेवले आहे. ही माझी वैय्यक्तिक मागणी नसून हजारो शिव-शंभू प्रेमींची मागणी आहे. मुळात महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे या मागणीचा गंभीर पाठपुरावा करण्याची गरज आहे.  यामुळे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आपण भगवा जाणीव आंदोलन करणार असल्याचे खा. कोल्हे यांनी सांगितले. शिवनेरीवर भगवा ही मागणी धार्मिक वा राजकीय नाही नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.