चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना डी.लीट. पदवी देऊन सन्मानित करणार आहे. गोंडवाना विद्यापीठात आज, गुरुवारी अधिसभेची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सन्मान्य पदवी प्रदान करण्यासंदर्भात राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्याकडून प्राप्त मान्यता पत्रानुसार दीक्षांत समारंभात सन्मान्य पदवी (डी.लीट) प्रदान करणेबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम १२९(१) (२) मधील तरतुदीच्या अनुषंगाने कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी विद्यापीठाची सन्मान्य पदवी प्रदान करण्याकरिता दोन नावे कुलपती यांच्याकडे प्रस्तावित केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार या दोन नावास मान्यता प्रदान करण्यात आली. कुलगुरुंनी कुलपतींची मान्यता मिळविली असेल अशा स्थितीत, कोणत्याही व्यक्तीस, कोणतीही चाचणी परीक्षा किंवा मूल्यमापन परीक्षा देण्यास भाग न पाडता, केवळ तिचे श्रेष्ठ स्थान, नैपुण्य व सार्वजनिक सेवा यामुळे सन्मान्य पदवी किंवा विद्याविषयक इतर विशेषोपाधी मिळण्यास ती पात्र व योग्य आहे, केवळ याच कारणांवरुन त्या व्यक्तीला अशी सन्मान्य पदवी किंवा विद्याविषयक इतर विशेषोपाधी प्रदान करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेला विचार करता येईल व अधिसभेला शिफारस करता येईल, अशी तरतुद आहे. त्यानुसार ४ डिसेंबर, २०२३ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या सभेत सदर दोन नावाची शिफारस अधिसभेला करण्यात आली.

Karnataka CM Siddaramaiah calls PM Modi nalayak loksabha election 2024
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना म्हटले ‘नालायक’; ‘चंबू’वरुन राजकारण का तापलंय?
Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
Sunita Kejriwal is likely to become Delhi Chief Minister
सुनीता केजरीवाल यांच्याक़डे मुख्यमंत्रीपद येण्याची शक्यता

हेही वाचा – पक्षश्रेष्ठींचे आदेश; काँग्रेसचे आमदार मुंबईत दाखल!

हेही वाचा – प्रेमदिनी प्रेयसीसाठी सांडले रक्त…मित्राला संपवून तो स्वत:च पोहोचला पोलीस ठाण्यात…

व्यवस्थापन परिषदेच्या शिफारशीनुसार उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मुनगंटीवार यांना विद्यापीठाची सन्मान्य पदवी बहाल करण्यास्तव यथोचितरित्या संमती मिळण्याकरीता अधिसभेपुढे बाब ठेवण्यात आली. सदर बाबीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या ११ व्या दीक्षांत समारंभात उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांना डी. लीट पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. ही अधिसभा कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.