पाचपैकी तीन सरपंच पदांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी

अमरावती : जिल्ह्यात पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारली असून पाचपैकी तीन सरपंच पदांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. ‍या ठिकाणी माजी मंत्री व तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एका ठिकाणी भाजपला संधी मिळाली असून एक जागा प्रहारच्या वाट्याला आली आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : राज्यातील महिला रामदास कदमांची जोड्याने पूजा करतील- भास्कर जाधव

हेही वाचा >>> वर्धा : पंतप्रधान मोदींबाबतच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद; नाना पटोलेंचा पुतळा जाळला

हिंदूत्ववादी भूमिकेमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या राणा दाम्पत्याला या निवडणुकीत हादरा बसला आहे. अमरावती जिल्ह्यात रविवारी पाच ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले होते. आज मतमोजणी पार पडली. यात तिवसा तालुक्यात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उंबरखेड ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी काँग्रेसचे नितीन कळंबे, घोटा ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसच्या रूपाली राऊत आणि कवाडगव्हाण ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी काँग्रेसच्या मोहिनी चौधरी  विजयी झाल्या. तिवसामध्ये तिन्ही ग्रामपंचायतीवर यशोमती ठाकूर यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील चांदूरवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वाखाली सरपंचपदी भाजपच्या वर्षा माताडे विजयी झाल्या आहेत. तसेच धारणी तालुक्यातील हरिसाल ग्रामपंचायतीमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे रामेश्वर दारशिंबे विजयी झाले आहेत.

हेही वाचा >>> नागपूर : संध्याका‌ळी सहानंतरही रुगणांना दाखल करून घ्या; नितीन गडकरींची एम्सच्या अधिकाऱ्यांना सूचना

राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गटाची झोळी रिकामी

शिंदे -फडणवीस सरकार आल्यानंतर प्रथमच सरपंचपदाची निवडणूक जनतेतून झाली. यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि शिंदे गटाला एकही जागा जिंकता आली नाही. राणा दाम्पत्यालाही यश मिळाले नाही.