अमरावती: शहरातील एका महिलेला पैशांची आवश्यकता असल्यामुळे तिने एका ऑनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून २२०० रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जापोटी त्या महिलेने तब्बल १० हजार रुपये परत केले. तरीही सायबर गुन्हेगार आणखी पैशांची मागणी करत होते. महिलेने नकार दिला तर तिचे अश्लील छायाचित्र तयार करून तिच्या परिचितांना पाठवले. हा प्रकार समोर येताच महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा नोंदवला.

शहरातील एका महिलेला कर्जाची आवश्यकता होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात मोबाइलवर ऑनलाइन ‘इझी लोन’ नामक अ‍ॅपची लिंक आली. कुठलेही कागदपत्र न देता, विना साक्षीदार कमीतकमी वेळात कर्ज उपलब्ध करून देण्याची बतावणी करण्यात आली. त्यामुळे महिलेने लिंक उघडून आवश्यक ती माहिती भरली. महिलेने त्या अ‍ॅपच्या माध्यमातून २२०० रुपये कर्ज घेतले. या कर्ज रकमेसोबतच तब्बल दहा हजार रुपयांचा भरणा करूनही सायबर गुन्हेगाराकडून महिलेला अधिक रक्कम भरण्याचा तगादा लावण्यात आला.

हेही वाचा… ग्रीन ब्रिगेडच्यावतीने यंदा १० हजार वृक्षांची लागवड; वाढत्या उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी संकल्प

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर गुन्हेगारांनी महिलेचे छायाचित्र मॉर्फ करून ते अश्लील छायाचित्र महिलेच्या परिचितांना पाठवले. त्यामुळे महिलेची सामाजिक बदनामी झाली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध विनयभंग तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.