नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत गडकरी यांचे नाव नसल्याने भाजपवर टीका झाली होती. त्यावेळी फडणवीस यांनीच विरोधकांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले होते व दुसऱ्या यादीत गडकरी यांचे नाव प्रथम क्रमांकावर असेल, असे नागपूरमध्ये सांगितले होते. बुधवारी भाजपची दुसरी यादी आली. त्यात गडकरी यांचे नाव होते. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता.

हेही वाचा – “मी कोरे पाकीट, जो पत्ता टाकला जाईल तिकडे पोहोचेल”, चंद्रकांत पाटलांकडून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत

हेही वाचा – महाविकास आघाडीचे अखेर ठरले! बुलढाणा लोकसभा मतदारसंघ…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरुवारी देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमासाठी नागपूरला आले होते. त्यावेळी त्यांनी गडकरी यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. गुरुवारी हे दोन्ही नेते काही कार्यक्रमात एकत्र सहभागी झाले होते. गडकरी हे सलग तिसऱ्यांदा नागपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. यापूर्वीच्या दोन निवडणुका त्यांनी दोन लाखांहून अधिक मताधिक्याने जिंकल्या आहेत.