गेल्या काही दिवसांपासून नागपूर सुधार प्रन्यासमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. मात्र, नागपूर सुधार प्रन्यास कारण नसताना आजही अस्तित्वात आहे. प्रन्यासची गुंठेवारी नियमित करण्याची योजना ही तेथील अधिकाऱ्यांची भ्रष्टाचाराची योजना आहे. सामान्य नागरिक कचाट्यात नागपूरकर सापडला आहे. त्यामुळे नासुप्र तात्काळ बरखास्त करावी, अशी मागणी जय जवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केली.

हेही वाचा >>>नागपूर: पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय; प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपाला धक्का

नागपूर सुधार प्रन्यासने नव्याने गुंठेवारी योजना अंमलात आणून १ लाख ७५ हजार भूखंड नियमित करण्यासाठी अधिकारी कामाला लागले आहे. नियमितीकरण्यात करण्यात येणारे एवढ्या मोठ्या प्रमाणात भूखंड आले कुठून असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. प्रन्यासमधील अनेक अधिकारी कोट्यवधींचे मालक झाले आहेत. शहराच्या सीमा त्याच असताना नवीन १ लाख ७५ हजार भूखंड नियमित करण्यासाठी अर्ज प्राप्त झाले असताना हे अर्ज कोणाचे आहे, याची शहनिशा केली पाहिजे आणि याचे अंकेक्षण केले पाहिजे, अशी मागणी पवार यांनी केली.

हेही वाचा >>>नागपूर: ११ महिन्यांच्या बाळासह आईने घेतली तलावात उडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुंठेवारी योजनेमुळे शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खेळाचे मैदान, शाळा, रुग्णालय, रस्ते किंवा सोयीसाठी शहरामध्ये जागा उपलब्ध नाही. नरेंद्रनगर, मनीषनगर, चिचभुवन, परसोडी, जयताळा, बाभुळखेडा, नारा नारी, दाभा, जरिपटका, इत्यादी वस्तीमध्ये आज रस्ते नाही. नागपूर सुधार प्रन्यास व ‘एनएमआरडीए’मध्ये अनेक वर्षापासून तेच तेच अधिकारी असल्यामुळे भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट तेथे कार्यरत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन सर्व कामे ऑनलाईन केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. पत्रकार परिषदेला अरुन वनकर, विजयकुमार शिंदे उपस्थित होते.