भंडारा : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी उडाली असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. येत्या १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. आता या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोण काय करेल, याचा नेम राहिला नाही. असाच एक प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला आहे. सरपंचपदासाठी निवडणुकीत उभ्या असलेल्या एका महिला उमेदवाराने दिलेल्या कर्तव्यनाम्याची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील सोमनाळा गावातील सरपंचपदाच्या महिला उमेदवार छबू वंजारी यांनी आपला जाहीरनामा चक्क १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिला आहे. एवढेच नव्हेतर नोटरीही केली आहे. अशा शासकीय दस्तावेजावर अधिकृत या जाहीरनाम्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. छबू वंजारी बी.एस्सी, एम.एस.डब्ल्यू. शिकलेल्या आहेत. येत्या १८ डिसेंबरला होणाऱ्या ८ सदस्यीय सोमनाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात त्यांनीही उडी घेतली आहे.

नागपूर : गृह खात्याच्या गोंधळाने जिल्हा रस्ता सुरक्षा समित्या रखडल्या! अधिसूचनेत समितीतील सदस्यांचे पदनामच चुकवले

गावात स्थानिक पातळीवरील दिग्गज स्थानिक नेते असताना आपण निवडणुकीत उभे असल्याने १२०० लोकसंख्या असलेल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी चक्क आपला जाहीरनामा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिला आहे. दोन पानी लिहिलेला हा जाहीरनामा आपण निवडून आल्यास आपल्याला बंधनकारक राहील असे त्यांनी म्हटले आहे.

उमेदवार मतदारांच्या भरवशावर निवडणूक येतात व त्याच मतदारांच्या विकासकामांचा त्यांना विसर पडतो. म्हणून मतदार उमेदवारांकडून नाराज असल्याने मतदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी आपण असे केल्याचे वंजारी सांगतात. त्यामुळे हा जाहीरनामा केवळ आपल्याला नाही तर आपल्या पूर्ण पॅनलसाठी बंधनकारक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District wide discussion declaration duty given woman candidate standing election post of sarpanch in bhandara district ksn 82 tmb 01
First published on: 13-12-2022 at 17:40 IST