नागपूर : द्वितीय विश्वयुद्धापूर्वी रंगीत टीव्ही विकसित केले गेले होते. परंतु बहुतेक युद्धाच्या काळात नागरी इलेक्ट्रॉनिक्स विकास गोठवला गेला असल्याने ऑगस्ट १९४४ मध्ये बेयर्डने इलेक्ट्रॉनिक रंगीत टेलिव्हिजन डिस्प्लेचे जगातील पहिले प्रात्यक्षिक दिले.

मात्र, भारतात आणि राज्याच्या उपराजधानीत हा रंगीत टीव्ही येण्यास १९८० च्या दशकापर्यंत वाट पहावी लागली. तत्कालीन नभोवाणी मंत्री वसंत साठे यांनी नागपुरात पहिला रंगीत टीव्ही आणला होता. नागपूर विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली होती. १९४८ मध्ये समाजवादी पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला, नंतर ते कॉँग्रेसमध्ये गेले. इंदिरा गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. १९७२ मध्ये पहिल्यांदा ते अकोल्याचे खासदार झाले.

हेही वाचा – धान्यात अफरातफर भोवली; आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार निलंबित

हेही वाचा – उपराजधानीत सत्तारुढ पक्षाच्या नेत्यांचा पोलिसांवर दबाव? दादागिरी करत गुंडांना पाठीशी घालण्याचे प्रकार

१९८० मध्ये ते माहिती व नभोवाणी मंत्री झाले. देशात रंगीत टीव्ही सुरू करण्याचे श्रेय साठे यांना जाते. नागपूरमध्येही पहिला रंगीत टीव्ही त्यांनीच आणला होता.