उपराजधानीतील अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेत (एम्स) गुडघा प्रत्यारोपणासाठी रुग्णांना तब्बल सहा महिन्याची तारीख डॉक्टरांकडून दिली जात आहे. त्यामुळे गुडघ्याच्या वेदनांनी विव्हळनाऱ्यांना प्रचंड मन:स्ताप होत आहे.उपराजधानीतील सर्वाधिक सुविधा असलेल्या शासकीय रुग्णालयात एम्सचे नाव वरच्या क्रमांकावरच आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यापासून इतरही सर्व पक्षातील नेते या रुग्णालयाची वेळोवेळी प्रशंसा करतात. एम्सला हळू- हळू रुग्णांचा प्रतिसाद वाढत असल्याने बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्या दोन हजारावर गेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>नागपूर: विदर्भात मुलींसाठी हक्काचे अनुरक्षण गृह नाही; बालगृहात १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींची अडचण

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctors are giving six month date to patients for transplant mnb 82 amy
First published on: 10-01-2023 at 15:28 IST