लोकसत्ता टीम
नागपूर : अंबाझरी तलाव व उद्यानाशेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन पाडल्याप्रकरणी कंत्राटाविरुद्ध कारवाई करण्यात यावी आणि येथे २० एकरमध्ये राज्य सरकारने स्मारक उभारावे, या मागणीसाठी मागील पावणे दोन वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. याच मागणीसाठी सोमवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यावरून आंदोलकांध्ये फूट पडली आहे. काहीजण एल्गार मोर्चावर ठाम आहेत तर काहींनी ही अभिवादन रॅली असल्याचे सांगितले.
आणखी वाचा-चक्क जिल्हाधिकार्यांच्याच नावाने बनवले बनावट Facebook प्रोफाइल
छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनीच्या औचित्य साधून डॉ. आंबेडकर स्मारकाच्या मागणीसाठी कृती समितीने एल्गार मोर्चा काढण्याचे ठरवले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलक आणि स्थानिक आमदार यांची बैठक बोलावून आंदोलकांच्या मागणी मान्य केली. तसेच आंदोलन न करण्याची विनंती केली. कृती समितीतील काही संयोजकांनी फडणवीस यांनी सूचना मान्य केली. परंतु काही संयोजकांनी सरकारकडून कोणतेही लेखी आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे एल्गार मोर्चा ठरल्याप्रमाणे काढण्यावर ठाम आहे. परिणामी काही कृती समितीच्या काही संयोजकांकडून मोर्चा नसून छत्रपती शाहू महाराज यांना अभिवानद रॅली आहे, असे मत आहे. तर काही संयोजकांनी एल्गार मोर्चा असल्याचे सांगितले. यासंदर्भात डॉ. सरोज आगलावे म्हणाल्या, सरकारच्या प्रतिनिधींकडून आंदोलनस्थळी भेट देण्यात आली. तसेच मे गरुडा ॲम्युझमेंट पार्क. प्रा.लि.ला दिलेला कंत्राट रद्द केला नाही. स्मारक उभारण्याचे लेखी आश्वासन देखील मिळाले नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे एल्गार मोर्चा काढण्यात येत आहे.
आणखी वाचा-अजनी रेल्वे पुलावर दिवसभरात ५ तास कोंडी; वाहतूक पोलीस केवळ नावापुरतेच
दरम्यान, हा व्हरायटी चौक ते संविधान चौक असा मोर्चा काढण्याची परवानगी पोलिसांनी दिली आहे. आंदोलकांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान देवगिरी येथेपर्यंत मोर्चा काढायचा होता.