अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्‍यक्ष आनंदराज आंबेडकर हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्‍यासाठी सज्‍ज झाले असून मंगळवारी त्‍यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यापूर्वी आनंदराज आंबेडकर यांनी शक्तिप्रदर्शन केले. त्‍यांनी याआधी कधीही निवडणूक लढविलेली नाही. ते पहिल्‍यांदाच निवडणुकीच्‍या रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्‍यानंतर पत्रकारांशी बोलताना आनंदराज आंबेडकर म्‍हणाले, आपण सर्वांच्‍या विकासासाठी काम करणार आहोत. मतदारांचा प्रचंड उत्‍साह पाहून आपला विश्‍वास द्विगुणीत झाला आहे. मतदार आपल्‍यावर विश्‍वास ठेवून निवडून देतील, अशी अपेक्षा आहे. अमरावती मतदारसंघाचा सर्वांगिण विकास हाच आपला ध्‍यास असेल, असे ते म्‍हणाले.

wardha lok sabha seat, devendra fadnavis, not attend, campaign rally , discussion started, bjp, less crowd, sharad pawar, rally, marathi news, maharashtra politics,
शरद पवारांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या फसलेल्या रॅलीची गावभर चर्चा; मात्र, भाजपा नेते म्हणतात…
supriya sule and prakash ambedkar
ठाकरे गटाबरोबर वाजलं, पण शरद पवार गटाला समर्थन; सुप्रिया सुळेंसाठी वंचितची माघार
uddhav thackeray Amit shah
उद्धव ठाकरेंचा भाजपाला दणका, नाराज खासदाराचा उद्या ठाकरे गटात प्रवेश; सुषमा अंधारेंची माहिती
devendra fadnavis and manoj jarange patil (1)
मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला आणि..”

हेही वाचा – “पक्षनिष्‍ठा आमचे भांडवल, कमजोरी नव्‍हे,” भाजपचे नेते तुषार भारतीय यांचा नवनीत राणांविरोधात सूर; म्हणाले…

आनंदराज आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्‍याचा दावा त्‍यांच्‍या समर्थकांकडून करण्‍यात आला असला, तरी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्‍वकर्मा यांनी मात्र अद्याप अधिकृतरीत्‍या आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर करण्‍यात आलेला नाही, असे सांगितले. पाठिंब्‍याविषयीचा निर्णय हे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि पक्षाची कार्यकारिणी घेईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. वंचित बहुजन आघाडीने अमरावती मतदारसंघातून प्राजक्‍ता पिल्‍लेवान यांना यापूर्वीच उमेदवारी घोषित केली आहे. आनंदराज आंबेडकर हे गेल्‍या दोन वर्षांपासून सातत्‍याने अमरावतीचा दौरा करीत आहेत. आपण अमरावतीतून निवडणूक लढवावी, अशी स्‍थानिक कार्यकर्त्‍यांची इच्‍छा होती, असे त्‍यांचे म्‍हणणे आहे.

हेही वाचा – रथातच बसणार… शरद पवारांचा हट्ट अन् नेत्यांची उडाली तारांबळ

आनंदराज आंबेडकर यांच्‍या उमेदवारीमुळे मतदारसंघातील लढत ही वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. अमरावतीतून कॉंग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी याआधीच उमेदवारी अर्ज दाखल केला असून उद्या बुधवारी प्रहार जनशक्‍ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब हे तर गुरुवारी ४ एप्रिल रोजी भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.