अकोला:डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कपाशीचे पाच ग्रॅमपर्यंत सरासरी बोंडाचे वजन असणारे नवीन वाण संशोधित केले आहे.बीटी कपाशीचे संकरित बियाणे शेतकऱ्यांंना मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाबीजमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. विद्यापीठाद्वारे संशोधित बियाण्यांचे उत्पादन व विपणन करण्यासाठी हा करार झाला.

कापूस हे विदर्भातील महत्त्वाचे पीक आहे. या पिकाच्या विविध समस्यांचा अभ्यास करीत एकात्मिक कीड, रोग नियंत्रण, अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीसह बीटी वाणाच्या विविध प्रजातींवर कृषी विद्यापीठाकडून संशोधन करण्यात आले. बीटी कपाशी बोंडांचा आकार ही मुख्य समस्या दूर झाली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामध्ये कृषी विद्यापीठाद्वारे संशोधित संकरित कपाशीच्या नवीन वाणामध्ये बिजी २ जणुकांचा अंतर्भाव करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

हेही वाचा >>>नाशिक : बहुतांश बाजार समित्यांमध्ये दुरंगी लढत, शिंदे गट-भाजप युती विरोधात महाविकास आघाडी मैदानात

यावेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्री, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी.बी. उंदीरवाडे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉ. नीळकंठ पोटदुखे, महाबीजचे महाव्यवस्थापक डॉ. प्रफुल लहाने, विवेक ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन केंद्राने संशोधित केलेल्या संकरित कपाशी वाणामध्ये महाबीजमार्फत बीटी जनुकांचा अंतर्भाव करण्यात येईल.

हेही वाचा >>>वृद्ध मतदारांचे होणार सर्वेक्षण; काय आहेत निवडणूक आयोगाचे निर्देश?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या करारामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या बोंडाचे व अधिक उत्पादनशील संकरित कपाशी वाण लवकरच उपलब्ध होईल, असा आशादायक डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केला. जनुकीय परिवर्तित कापूस वाणाच्या उत्पादन आणि विपणनात महाबीज सर्व क्षमतेने सहयोगाची भूमिका स्वीकारेल व सुधारित बीटी वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे सचिन कलंत्री म्हणाले.प्रास्ताविकात डॉ. विलास खर्चे यांनी विद्यापीठाद्वारे संशोधित करण्यात आलेल्या विविध पीक वाणांचे व विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नवीनचंद्र कायंदे यांनी, तर आभार डॉ. सुरेंद्र देशमुख यांनी मानले.