नागपूर: हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे. गोमूत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गायीच्या पोटात ३३ कोटी देवतांचा वास असल्याची समजूत अगदी प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे दिसून येते.

हिंदू धर्म होते श्रावण महिन्यात अन्नदानाला अधिक महत्त्व देण्यात आलेला आहे. त्यामुळे गाईला मानवी अन्न देऊन या माध्यमातून आपण ३३ कोटी देवी देवतांना अन्नदान केल्याचे समाधान मिळवण्यासाठी अनेक लोक या दिवसात गाईला जेवण वाढतात. मात्र याचा परिणाम गाईंच्या आरोग्यावर झाल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा… चंद्रपुरात १०० रुपयात मिळणार ‘शेअरिंग सायकल’; नेमका काय आहे उपक्रम, जाणून घ्या…

श्रावण महिन्यात गाईंना वारंवार अन्न दिल्याने त्यांच्या पोटावर सूज येऊन अनेक जनावरे दगावत असल्याची माहिती पशुवैद्यकानी दिली आहे. या संदर्भात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माजी निवृत्त प्राध्यापक डॉक्टर शहापूरे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी गायीच्या पचनक्रियेविषयी माहिती दिली. गायीचे पोट हे चारा खाण्यासाठी तयार झाले आहे. मानवी शरीरामध्ये चार प्रकारच्या पचन क्रिया असतात. त्यामुळे मानवी शरीर हे आम्ल पदार्थ असणारे अन्न पचवू शकते.

हेही वाचा… मुलाच्या चतुराईने पित्याचे अनैतिक संबंध उघड; अखेर पोलिसांनी समुपदेशाने दोन्ही कुटुंबाची गाडी आणली रुळावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र जनावरांच्या शरीराची रचना ही वेगळी आहे. त्यामुळे त्यांच्या पोटात केवळ गवत प्रकारातील चाराच पचू शकतो. त्यांना अन्न दिल्याने अनेकदा गाईचे पोट फुगून आजारी पडल्याच्या तक्रारी आमच्याकडे येतात. यामुळे अनेकदा जनावरे दगावत असतात. त्यामुळे धार्मिक भावना म्हणून गाईला अन्नदायचे असेल तर ते अगदी नैवेद्य दाखवण्यापुरते द्यावे अन्यथा त्यांचे आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतो असेही डॉक्टरांचे मत आहे.