नागपूर : टिपेश्वर अभयारण्यातील उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे वाघांची संख्या वाढली. पण, अधिवास क्षेत्र कमी पडत असल्यामुळे येथील वाघ बाहेर पडत आहेत. अभयारण्याला जोडणाऱ्या ‘कॉरिडॉर’मध्ये वन्यजीव व्यवस्थापन झाले नाही, तर येथेही मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तो थांबवण्यासाठी अभयारण्याला प्रादेशिकची साथ हवी आहे.

१८३ चौरस किलोमीटरच्या या अभयारण्यात अलीकडच्या काही वर्षात वाघांची संख्या चांगलीच वाढली आहे. वन्यजीव विभागाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे हे शक्य झाले आहे. वाघांना सामावून घेण्याची टिपेश्वर अभयारण्याची क्षमता संपली आहे. परिणामी, वाघांना त्यांचा अधिवास कमी पडत असल्याने लगतच्या प्रादेशिक वनक्षेत्रात वाघ जात आहेत. त्यामुळे अभयारण्यासोबतच आता प्रादेशिकमध्ये वाघांची संख्या चांगली आहे. अभयारण्य व लगतचे क्षेत्र मिळून सुमारे ३५ वाघ या ठिकाणी असावेत असा अंदाज आहे. अभयारण्याव्यतिरिक्त असलेल्या लगतच्या वनक्षेत्रात वन्यजीव व्यवस्थापन नाही. त्यामुळे अभयारण्यालगतच्या या जंगलात २०१६च्या शासन निर्देशानुसार उत्कष्ट व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. ते नसल्यामुळेच ब्रम्हपुरी, वडसा, चंद्रपूर व गडचिरोलीनंतर टिपेश्वरमध्येही मानव-वन्यजीव संघर्षाला सुरुवात झाली आहे.

hot temperature, reptiles, snakes affected, cold temperature, enters in citizen colony, marathi news, snake news, snake in uran, uran news, uran snake news,
उरण : उन्हाच्या तडाख्याचा सरपटणाऱ्या प्राण्यांना फटका, गारव्यासाठी नागरी वस्तीत शिरकाव
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा

हेही वाचा… “टिपेश्वर अभयारण्यातील वाघांच्या अस्तित्वाला धोका, वन्यजीवांचा अधिवास नष्ट होण्याची भीती” पर्यावरणप्रेमींसह शेतकरी आणि नेत्यांचा आक्षेप काय?, वाचा…

काही वर्षांपूर्वी ‘अवनी’ या वाघिणीचा मृत्यू याच संघर्षातून झाला होता. खाद्यान्नाची घनता अतिउत्कृष्ट असेल तर एका वाघाला साधारणपणे १२ चौरस किलोमीटर क्षेत्र पुरेसे असते. मेळघाटमध्ये एका वाघाचे क्षेत्र हे ४० चौरस किलोमीटरचे आहे. कारण याठिकाणी वाघांना आवश्यक असणारी खाद्यान्नाची घनता नाही. ताडोबात ती ७.८३ चौरस किलोमीटर तर टिपेश्वरमध्ये ११ चौरस किलोमीटर आहे.

हेही वाचा… नागपूर: लकडगंजमध्ये १८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त; ‘लोकसत्ता’च्या बातमीची दखल

वाघांचे सर्वात लांब अंतराचे (सुमारे ३२००) किलोमीटरचे स्थलांतरण याच टिपेश्वर अभयारण्यातून झाले होते. विदर्भातला हा वाघ तेलंगणामार्गे मराठवाडा आणि पुन्हा विदर्भात परतला आणि बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावला. मेळघाट, नागझिऱ्यानंतर अनुवंशिकदृष्ट्या इथला वाघ बलवान आहे. त्यामुळे इथल्या वाघांना संचारमार्ग आणि अधिवासासोबतच त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाची देखील आवश्यकता आहे. अन्यथा येथेही मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागू शकतो. – यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक