लोकसत्ता टीम

नागपूर : गडचिरोली वनवृत्त सिरोंचा वन विभागाअंतर्गत कमलापुर वनपरिक्षेत्रमध्ये कार्यरत असलेले अजित, मंगला, बसंती, रुपा, राणी, प्रियांका, गणेश, लक्ष्मी अशा आठ हत्तींचे ‘चोपिंग’ असल्याने त्यांना हक्काच्या सुट्टीवर पाठवले जात आहे.

Sassoon, pune, Sassoon dean,
ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका
nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
bjp leader ganesh naik campaign for his son sanjeev naik
गणेश नाईकांची पुत्र संजीव नाईकांसाठी मिरा-भाईंदर मध्ये मोर्चे बांधणी, जुन्या समर्थकांना सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

वाढत्या थंडीमुळे हत्तीच्या तळपायाला भेगा पडतात. चालताना त्यांना त्याचा त्रास होतो. त्या भेगांवर आणि दुखऱ्या पायांवर उपचारासाठी त्यांना वैद्यकीय सुट्टी देण्यात आली आहे. अशी सुट्टी त्यांना दरवर्षीच देण्यात येते. या दहा दिवसात त्यांच्या पायांना ‘चोपिंग’ औषधांचा शेक दिला जातो. ४०-४५ प्रकारच्या जडीबुटींपासून औषध तयार केले जाते. त्यासाठी हिरडा, बेहडा, सुंठ, त्रिफळा, जायफळ, आसमंतारा अशा वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर करून एका ड्रममध्ये उकडून ‘चोपिंग’ चा लेप तयार करतात. तो करून महावत, चाराकटर पहाटेला हत्तीचे पाय शेकतात.

आणखी वाचा-बुलढाणा: बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी जखमी; आरडाओरड केल्याने वाचले प्राण

महाराष्ट्रातील एकमेव हत्ती बघण्यासाठी कमलापुर हत्ती कॅम्पला अनेक पर्यटक येत असतात. नक्षलग्रस्त भागात असूनही पर्यटकांच्या आवडीचे ते ठिकाण आहे. येथील हत्तींनी पर्यटकांना लळा लावला आहे. शासनाने मात्र अजूनही या हत्ती कॅम्प ला गंभीरपणे घेतलेले नाही. येथील पदभरती रखडली आहे. माहूत आणि चाराकटरची संख्या कमी असूनही त्यांनी पोटच्या मुलांप्रमाणे या हत्तींना जपले आहे आणि जपत आहेत. मात्र, सध्या हा कॅम्प बारा दिवसासाठी बंद आहे. कारण हत्ती सध्या सुट्टीवर आहेत.

दरवर्षी या काळात हत्तींना आराम देऊन त्यांच्या पायांना ‘चोपिंग’ केले जाते, असे कमलापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश चोके म्हणाले.

बारा दिवस चालणाऱ्या या ‘चोपिंग’ मध्ये हत्तींची विशेष काळजी घेतली जाते. त्यादरम्यान त्यांच्या प्रकृतीची तपासणी व रक्त तपासणी केले जाते’ असे कमलापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेश येमचे म्हणाले.