जिंठा महामार्गावरील पांगरी उबरहंडे या गावात उबरहंडे या आडनावाचे प्राबल्य आहे. यामुळे उबरहंडेचे गाव अशी गावाची जुनी ओळख. अलीकडे गावाला झेंडू फुल उत्पादकांचे गाव, अशी नवीन ओळख येथील प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे निर्माण झाली आहे.

हेही वाचा- वाशिम : शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून ५० ‘एसटी बसेस’ जाणार , प्रवाशांना मात्र मन:स्ताप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथील फुलांचा दर्जा चांगला असल्याने यंदा दसऱ्यानिमित्त पुणे व मुंबईसह हैदराबादच्या बाजारपेठेत आतापर्यंत सुमारे १०० क्विंटल झेंडू पाठविण्यात आला आहे. झेंडूची वाढती मागणी, कमी वेळात होणारे उत्पादन व उत्पन्न पाहता येथील शेतकरी फुलशेतीकडे वळले आहेत. यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड केली आहे. किरकोळ विक्री न करता थेट मोठ्या व्यापाऱ्यांना झेंडूची विक्री करण्याकडे येथील शेतकऱ्यांचा कल आहे. यंदा मागणी चांगली असून दरही समाधानकारक मिळाल्याचे माजी सरपंच बाळासाहेब उबरहंडे यांच्यासह परेश उबरहंडे, दिलीप उबरहंडे, अनिल कऱ्हाडे, एकनाथ उबरहंडे, विनायक उबरहंडे, संदीप उबरहंडे यांनी संगितले.