नागपूर : गेमिंग ॲपवर जुगार खेळण्याचे व्यसन लागल्यामुळे मध्यप्रदेशातील उच्चशिक्षित दोन युवकांनी चक्क बनावट नोटा घरीच छापण्याची योजना आखली. शंभर रुपये किंमतीच्या हुबेहुब दिसणाऱ्या जवळपास १० हजार नोटा छापल्या. या नोटा बाजारात चालविण्यासाठी एका युवकाला नागपुरात पाठवले. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली. त्यांच्याकडून ४८ हजार ७०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

मध्य प्रदेशातील सिंधी जिल्ह्यातील बहेरी गावचा मुख्य आरोपी आकाश अन्नपूर्णाप्रसाद पांण्डेय (२१) हा काम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये पदवीधर आहे. आकाशला ऑनलाईन गेम खेळण्याची सवय लागली. तो एकाच तासात दीड लाख रुपये हरला. त्यामुळे त्याने मित्र धीरज दिनेश तिवारी (२८,डागा, अमरपाटन) याच्यासह बनावट नोटा छापण्याची योजना आखली. त्याने शंभर रुपये किमतीच्या हुबेहुब नोटा छापणे सुरू केले.

हेही वाचा – रेल्‍वे मार्गावर घडणारी गुन्‍हेगारी नियंत्रणात; गेल्‍या वर्षीच्या तुलनेत घट

हेही वाचा – आईचा खून झाल्याचे कळताच निःशब्द झाला मुलगा! भाजपा नेत्या सना खानचा मारेकरी अमितला शुक्रवारपर्यंत कोठडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवीण रामजी पाटील (२१, पीपरहा, ता. सिहाओल) याला नागपुरात ५०० बनावट नोटांसह पाठवले. त्याने आतापर्यंत बाजारात अनेक नोटा चलनात आणल्या. गुन्हे शाखेचे ओमप्रकाश कोकाटे यांना बनावट नोटाबाबत माहिती मिळाली. त्यांनी गौंडखेरी येथील एका गोदामावर छापा घातला. प्रवीण पाटील याला बनावट नोटासह अटक केली. त्यानंतर मध्यप्रदेशातून मुख्य सूत्रधार आकाश पाण्डेय आणि धीरज तिवारी यांना अटक केली. त्याच्याकडून बनावट नोटा आणि नोटा तयार करण्याची मशीन जप्त केली.