नागपूर : साऊथ इंडियन डिशमधील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे डोसा आणि सांबार. संपूर्ण देशभरात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. सकाळच्या नाश्त्यासाठी हटके बेत म्हणजे डोसा. अनेक खाद्य पदार्थाचे विक्रम करणारे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रविवारी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सकाळी आणखी एक विक्रम केला. एक एक करत पहिल्या दोन तासांत १ हजारपेक्षा जास्त डोसे शिजवले. त्याचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांनी एकच गर्दी केली आहे.

जवळपास २५ विश्वविक्रम आपल्‍या नावावर करणारे आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीचे शेफ विष्‍णू मनोहर यांनी सकाळी ७ वाजता यांनी नवा विक्रम करण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता पहिल्या दोन तासात दीड हजारचा टप्पा गाठला. डोसे शिजले तसे आलेले लोक त्याचा आस्वाद घेत होते. सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत सलग २४ तास उपक्रम सुरू राहणार आहे. बजाज नगरातील विष्णूजी की रसोई परिसरात या ठिकाणी हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमासाठी विष्णू मनोहर यांनी १०० किलो – उडद दाळ. ३०० किलो – तांदूळ, ३५ किलो मेथी दाणे, ५० किलो पोहे, २०० किलो शेंगदाणा तेल २०० किलो चटणीसाठी खोबरे, १०० लिटर दही, १०० किलो डाळ, ५० किलो – लाल मिर्ची ५ किलो – हिंग ५ किलो – मोहरी, ५० किलो – मिठ २५ किलो- कोथिंबिर, ५० किलो – साखर ५ किलो कढीपत्ता उपयोगात आणणार आहे.

हेही वाचा – भाजप आमदार बंडखोरीच्या तयारीत? अर्ज भरण्यास दिले समर्थकांना निमंत्रण

हेही वाचा – महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आक्षेपार्ह ‘व्हिडिओ व्हायरल’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विष्णू मनोहर यांनी यापूर्वी अयोध्येतील सात हजार किलोचा ‘राम हलवा’, सर्वात मोठा व्हेज कबाब, सर्वात मोठा पराठा, सर्वात मोठी पुरणपोळी, ५२ तासांची नॉन-स्टॉप कुकिंग मॅरेथॉन असे विविध २५ विश्वविक्रम आपल्‍या नावावर केले आहेत.