scorecardresearch

Premium

पावसापासून बचावासाठी घेतला झाडाचा आधार अन् पुढे घडला अनर्थ…

बाळापूर तालुक्यातील टाकळी खुरेशी येथे अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार सायंकाळी घडली.

farmer died due to lightning
अचानक वीज कोसळल्याने पद्माकर घोगरे यांचा जागीच मृत्यू झाला. (फोटो- प्रातिनिधिक)

लोकसत्ता टीम

अकोला : बाळापूर तालुक्यातील टाकळी खुरेशी येथे अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार सायंकाळी घडली. पद्माकर आत्माराम घोगरे (५८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

Woman murder for four wheeler
वाशिम : हुंडा बळीतून महिलांची सुटका कधी? चारचाकी गाडीसाठी महिलेची गळा चिरून हत्या !
Loksatta lokrang Double decker trek Meghalaya
निमित्त: डबल डेकर ट्रेक
16 suspects detained in case of offensive message in Nandgaon taluka
नांदगाव तालुक्यात आक्षेपार्ह संदेशप्रकरणी १६ संशयित ताब्यात
Boyfriend knife attack on girlfriend
प्रेयसीवर चाकूने सपासप वार अन् प्रियकरानेही गळा कापून घेतला, अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

जिल्ह्यात गुरुवारी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. टाकळी खुरेशी येथील पद्माकर घोगरे हे शेतात गुरे चारण्यासाठी गेले होते. पावसाला सुरुवात होताच त्यांनी झाडाचा आडोसा घेतला.

आणखी वाचा-बुलढाण्यात पावसाचे पुनरागमन; पाच मंडळात अतिवृष्टी

अचानक वीज कोसळल्याने पद्माकर घोगरे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Farmer died on the spot due to lightning ppd 88 mrj

First published on: 22-09-2023 at 14:07 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

×