अमरावती : ज्या व्यक्तीचे मूत्रपिंड खराब झाले आहे. डायलेसिस अथवा अन्य औषधोपचारांचा पर्याय अयशस्वी ठरला आहे, अशा व्यक्तींना मूत्रपिंड प्रत्यारोपणाशिवाय पर्याय राहात नाही.

मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यापूर्वी रुग्णाचा आणि दात्याचा रक्तगट जुळणे आवश्यक असते. रक्तगट जुळला तरच मूत्रपिंड दान करता येऊ शकते. मूत्रपिंड दान करणे हे कुटुंबातील व्यक्तींनाच शक्य होते.

अमरावतीच्‍या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) ५३ वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. रुग्णालयामध्ये होत असलेल्या यशस्वी व विनामूल्य शस्त्रक्रियेमुळे या ठिकाणी इतर राज्यांमधून सुद्धा रुग्ण येत असतात. रुग्णालयात सतीश प्रभाकर मेश्राम (३५) यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. सतीश हे वरूड तालुक्यातील रहिवासी असून गेल्या चार महिन्यांपासून मूत्रपिंड विकाराने त्रस्त होते,

त्यामुळे डायलेसिस सुरू होते. मूत्रपिंड प्रत्यारोपण हा योग्य उपाय आहे, असे डॉक्टरांनी सांगितले, त्यावेळी मुलाच्या भविष्याचा  विचार करून वडील प्रभाकर गोविंद मेश्राम (६३) यांनी आपले एक मूत्रपिंड मुलगा सतीश यांना देण्याचा निर्णय घेतला आणि त्याला नवीन जीवन दिले. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्ट  डॉ. हितेश गुल्हाने, युरो सर्जन डॉ.राहुल पोटोडे, डॉ.विक्रम देशमुख, डॉ. राहुल घुले, डॉ. प्रतीक चिरडे, डॉ.विशाल बाहेकर, बधिरिकरण तज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. दीपाली देशमुख,डॉ. शीतल सोळंके, डॉ.अश्विनी मडावी, डॉ.अंजु दामोदर, डॉ.विक्रांत कुळमेथे, डॉ.माधव ढोपरे, डॉ. जयश्री पुसदेकर, डॉ.नाहीद, डॉ. उज्वल अभ्यंकर, डॉ. प्रियंका कांबळे, समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) शीतल बोंडे, ऋषिकेश धस, डॉ.सोनाली चौधरी, डॉ. पायल रोकडे ,डॉ. दिव्यांनी मुंदाने, अधिसेविका चंदा खोडके, माला सुरपाम यांच्या सूचनेनुसार इन्चार्ज सिस्टर  ज्योती तायडे, ज्योती काळे,लता मोहता, सरला राऊत, नीता कांडलकर, पूजा लांडे, दिपाली तायवाडे, अभिजीत निचत, वैष्णवी निकम, अक्षय पवार, मयुरी खेरडे,अनु वडे, योगिश्री पडोळे,रेखा विश्वकर्मा, वैशाली ढोबळे, जमुना मावसकर, वैभव भुरे, अभिजीत देवधर, अभिजीत खंडारे, शितल वायझाडे, आहारतज्ञ रश्मिता, कविता देशमुख, योगेश वाडेकर, पंकज बेलुरकर, आशीष तायडे आदींचे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये विशेष सहकार्य होते.