नामिबियाहून भारतात आणलेल्या चित्त्याचा मृत्यूने हळहळलेल्या चित्ताप्रेमींसाठी आता आनंदाची बातमी आहे. मध्यप्रदेशातील ज्या कुनो राष्ट्रीय उद्यानात ‘साशा’ नामक मादी चित्त्याचा मृत्यू झाला, त्याच उद्यानातील दोन मादी चित्ता गर्भवती होत्या. त्यातील एकीने चार शावकांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामानबदल मंत्री भूपेंदर यादव व मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या शावकांची चित्रफित व छायाचित्र ट्वीट करुन माहिती दिली आहे.

हेही वाचा >>>यवतमाळ : अमृत योजनेत साडेसहा कोटींची अनियमितता; कार्यकारी अभियंत्याला अटक

Bee attack on wrestling ground near Patan karad
पाटणजवळ कुस्ती मैदानावर मधमाशांचा हल्लाबोल; पहिलवानांसह १५ जण जखमी
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
alibag mother killed her two kids marathi news
माता नव्हे तू वैरीणी! विवाहबाह्य संबंधांत अडथळा ठरलेल्या २ चिमुकल्यांचा आईनेच घेतला जीव
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

नामिबियातून आठ चित्त्यांची पहिली तुकडी भारतात १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी पोहोचली. त्यानंतर पाच मादी आणि तीन नर चित्त्यांचा त्यात समावेश होता. पंतप्रधानांच्या हस्ते त्यांना मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील विलगीकरण कक्षात सोडण्यात आले. त्यानंतर त्यांना खुल्या पिंजऱ्यात आणि अलीकडेच त्यातील चार चित्त्यांना जंगलात सोडण्यात आले. विलगीकरणातून त्यांना खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आल्यानंतर ‘सियाया’ आणि ‘आशा’ या दोन मादी चित्ता नर चित्त्याच्या संपर्कात आला. एक दिवसांपूर्वीच मृत पावलेल्या ‘साशा’ ही देखील नर चित्त्याच्या संपर्कात आली. मात्र, किडणीच्या आजारामुळे तीला गर्भधारणा झाली नाही.

हेही वाचा >>>यवतमाळ : दरोड्याच्या उद्देशाने यवतमाळात आलेली टोळी देशी कट्ट्यासह जेरबंद

मात्र, ‘सियाया’ आणि ‘आशा’ या दोन्ही मादी चित्ता यांना डिसेंबर २०२२ मध्ये गर्भधारणा झाली. ‘सियाया’ ती सुमारे तीन वर्षाची असून ‘आशा’ चार वर्षाची आहे. चित्त्यांचा गर्भधारणेचा काळ साधारणपणे ९० दिवसांचा असतो. त्यातील ‘सियाया’ ने बुधवारी सकाळी चार शावकांना जन्म दिला. तर ‘आशा’ देखील एप्रिलच्या उत्तरार्धात शावकांना जन्म देईल, असे सांगितले जात आहे. तब्बल सात दशकानंतर भारतात चित्त्यांचा जन्म झाला असून यामुळे चित्ता प्रकल्पाला बळ मिळाले आहे.