नागपूर : कबड्डी प्रशिक्षकाकडून महिला खेळाडूचा लैंगिक छळ

मुलीच्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षकाने १६ वर्षीय खेळाडू मुलीला कबड्डी शिकवताना अश्लील चाळे केले.

नागपूर : कबड्डी प्रशिक्षकाकडून महिला खेळाडूचा लैंगिक छळ
( संग्रहित छायचित्र )

मुलीच्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षकाने १६ वर्षीय खेळाडू मुलीला कबड्डी शिकवताना अश्लील चाळे केले. या प्रकरणी खेळाडूच्या तक्रारीवरून प्रशिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना जुनी कामठी परिसरात घडली. जय प्रकाश मेथीया (३८, कादरझेंडा, जुनी कामठी) असे आरोपी प्रशिक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय प्रकाश मेथीहा हा कबड्डीच्या मुलींच्या संघाचा प्रशिक्षक असून जुनी कामठीत नागसेन क्लब मैदानावर सराव शिबीर घेतो. तेथे पीडित १६ वर्षीय मुलगी राज्य स्तरीय कबड्डी खेळाडू यायची. मे महिन्यात पहिल्यांदा मेथीया याने मुलीला कबड्डी शिकविण्याच्या बहाण्याने तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यानंतर उंची वाढविण्यासाठी मसाज करण्याच्या नावाखाली तिच्याशी चाळे केले. ६ ऑगस्टला मुलीला रामटेक येथे कबड्डीच्या शिबिरासाठी दुचाकीवरून नेले. तिला दुचाकी शिकवताना विनयभंग केला. त्यानंतर तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या जय मेथीयाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मारहाण केली.

घरी गेल्यानंतर तिची अवस्था बघून आईवडिलांनी तिला विचारणा केली. मुलीने प्रशिक्षकाने केलेल्या कृत्याचा पाढा वाचला. या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी जय मेथीयाला अटक केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बुलढाणा : परीक्षेत मिळाले कमी गुण; आईने मुलाला दिले चटके आणि घराबाहेर काढले
फोटो गॅलरी