नागपूरच्या अंतरा मेहता यांची भारतीय हवाई दलात ‘फायटर पायलट’ (लढाऊ वैमानिक) म्हणून निवड झाली असून या पदावर निवड झालेल्या त्या महाराष्ट्रातील पहिल्याच आहेत. शिवाय  ‘फ्लाइंग ऑफिसर’ म्हणून निवड झालेल्या या वर्षीच्या तुकडीतील त्या देशातील एकमेव महिला अधिकारी आहेत. त्यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंतरा मेहता हैदराबाद येथील हवाई दलाच्या अकादमीतून शनिवारी फ्लाइंग ऑफिसर म्हणून उत्तीर्ण झाल्या. त्या यंदाच्या तुकडीतील एकमेव महिला अधिकारी आहेत. त्यांचा देशातील पहिल्या दहा महिला फायटरमध्ये समावेश झाला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण शहरातील नामवंत माऊंट कार्मेल गर्ल्स स्कूल, रामदेवबाबा अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातून २०१८ मध्ये झाले. त्यानंतर त्यांनी एसएसबीची तयारी केली आणि तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हैदराबाद येथील डुंडीगल येथील एअर फोर्स अकादमीत प्रवेश घेतला. यानंतर त्यांनी ‘पिलेटस पीसी-७’ व दुसऱ्या टप्प्यात त्यांनी ‘किरण एमके-१’ हे लढाऊ  विमान उडवले. डुंडीगल येथे शनिवारी झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांच्यासह १२३ प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण झाले. आता त्यांना बिदर आणि कलाईकोंडा येथे ‘हॉक्स’ लढाऊ विमानाचे प्रशिक्षण दिले जाईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fighter pilot in antra mehta air force nagpur abn
First published on: 22-06-2020 at 00:46 IST