नागपूर : रा.स्व. संघाच्या महाल मधील केंद्रीय कार्यालय परिसरात चित्रीकरण करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे हा आदेश काढला आहे. रा.स्व. संघाचे महालमधील केंद्रीय कार्यालयालगत दाट रहिवासी वस्ती, खासगी आस्थापना (उदा. हॉटेल्स, लॉजेस, कोचिंग क्लासेस, इत्यादी) आहेत.

संघ कार्यालय व आजूबाजूच्या परिसरात व रस्त्यांवर लोकांची सतत वर्दळ असल्याने कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून छायाचित्रण, व्हिडिओग्राफी, ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्यास संघ कार्यालयास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. १ एप्रिलपर्यंत हा आदेश अंमलात राहणार आहे.

navi mumbai illegal nursery marathi news
नवी मुंबई: कारवाईनंतरही रोपवाटिका उभी, एनआरआय परिसरात डीपीएस शाळेजवळील भूखंडावर पुन्हा अतिक्रमण
Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी