नागपूर : नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) वार्ड क्रमांक ३४ मध्ये मंगळवारी दुपारी आग लागली. वार्डात धूर पसरल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची तारांबळ उडाली. वेळीच कर्मचाऱ्यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे रुग्णांचा जीव भांड्यात पडला.

मेयो रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, अस्थिरोग विभागाच्या वार्ड क्रमांक ३४ मध्ये डॉक्टरांची वेगळी खोली आहे. या खोलीत शाॅर्ट सर्किट झाल्याने तेथे आग लागली. वार्डात धूर शिरल्याने नातेवाईकांत पळापळ झाली. तातडीने मेयो रुग्णालयातील पाॅवर सेफ्टी अधिकारीसह महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी वार्डात पोहोचून आगीवर अग्निशमन यंत्रातून वायूचा मारा केला. त्यापूर्वी येथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

mumbai university, xerox center, new exam building, kalina,
मुंबई : नवीन परीक्षा भवनात छायांकित प्रत केंद्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ
Pune, Sassoon, politics,
पुणे : ससूनमध्ये राजकारण जोमात, रुग्णसेवा कोमात! उपचार अन् औषधाविना रुग्णांचे हाल
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष

हेही वाचा – पाळीव किंवा भटक्या श्वानांना माणसांचा लळा का लागतो?

आगीवर नियंत्रण मिळाल्यावर सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. दरम्यान या प्रकरणात मेयो प्रशासनाने अहवाल मागितला आहे. त्यातून या आगीचे कारण स्पष्ट होणार आहे.