नागपूर जिल्ह्य़ात पाच तरुण बुडाले

नागपूर जिल्ह्य़ातील गाडेघाट येथील अम्माचा दर्गा येथे १३ तरुण दर्शनासाठी आले होते.

प्रतिनिधिक छायाचित्र
नागपूर : यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातून नागपूर जिल्ह्य़ातील गाडेघाट येथील अम्माचा दर्गा येथे १३ तरुण दर्शनासाठी आले होते. पाच पैकी चार जण परिसरातील कन्हान नदीत पोहण्यासाठी गेले. ते बुडू लागल्याने पाचवा त्यांना वाचवण्यासाठी गेला असता तोही बुडाला. त्यातील एकाचा मृतदेह मिळाला होता तर इतर चौघांचे मृतदेह मात्र सापडले नाही. रविवारी शोधमोहीम थांबवण्यात आली. सोमवारी पुन्हा शोधमोहीम सुरू होणार आहे.

सय्यद अरबाज ऊर्फ लकी (२२), अयाज बेग हफीज बेग (२०), मो. अबजर मो. अल्ताफ (१८), मो. सत्पतीन मो. इकबाल (२१), ख्वाजा बेग तस्वर बेग (१७) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. त्यात एकाचा मृतदेह आढळल्याचे कन्हानचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Five youths drowned in nagpur district zws