चंद्रपूर : प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाली. यानंतर आठ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या निर्देशानुसार जेवणाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. विषबाधा कशातून झाली, हे अहवालानंतरच स्पष्ट होईल. रविवारी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गृह विभागाने काही महिन्यांपूर्वी पोलीस भरती घेतली. या भरतीत पात्र ठरलेले सुमारे २०० पोलीस कर्मचारी चंद्रपुरात प्रशिक्षणासाठी आले आहेत. हे सर्व कर्मचारी पोलीस मुख्यालयात राहत असून याच परिसरातील ‘कॅन्टिन’मध्ये सकाळ आणि रात्रीचे जेवण करतात. रविवारी सुमारे ४० प्रशिक्षणार्थ्यांनी येथे जेवण केले. यानंतर काही प्रशिक्षणार्थ्यांना त्रास जाणवू लागला. सर्व प्रशिक्षणार्थ्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील आठ कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food poisoning of trainee police personnel chandrapur rsj 74 amy
First published on: 10-03-2024 at 21:55 IST