नागपूर: राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे यांचे गुरुवारी सकाळी अहिल्या मंदीर धंतोली,नागपूर येथे निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या. प्रमिलाताई गेली तीन महिने आजारी होत्या. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रकृती अतिशय क्षीण झाली होती. प्रमिलाताईंच्या इच्छेनुसार एम्समध्ये त्यांचे पार्थिव देहदान केले जाणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सकाळी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. प्रमिलाताई मेढे या राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख होत्या. त्यांना एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाने मानद डॉक्टर ऑफ लेटर्स (डी.लिट.) ही पदवी दिली होती. १८ जानेवारी २०२० रोजी, महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता.
गडकरी नाही दु:ख,काय म्हणाले?
राष्ट्रीय सेविका समितीच्या माजी मुख्य संचालिका प्रमिला मावशी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला दुःख झाले. भारतात समितीच्या कार्याचा विस्तार करण्यात प्रमिला मावशीचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांचे संपूर्ण जीवन देशभक्ती आणि महिला शक्ती जागृतीसाठी समर्पित होते. अध्यापन आणि नोकरी सांभाळत असताना, त्यांनी राष्ट्रीय सेविका समितीच्या शाखा तळागाळापर्यंत पोहचल्या.
शहर, विभाग आणि राज्य पातळीपर्यंतच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. समितीच्या अखिल भारतीय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, प्रमिला मावशी यांनी संपूर्ण भारत आणि परदेशात प्रवास केला. सामाजिक प्रबोधन आणि महिलांच्या नवोपक्रमातील तिचे प्रयत्न उल्लेखनीय होते. देशभर प्रवास करून त्यांनी महिला शक्तीचे संघटन आणि जागरण करण्याचे काम केले. आईसारखे व्यक्तिमत्व असलेल्या प्रमिला मावशीने स्वयंसेवकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या सोडवल्या. आज आपण सर्व स्वयंसेवकांनी एक मातृत्वाचे व्यक्तिमत्व गमावले आहे.