माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेसचे माजी शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक दीपक जयस्वाल राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.

काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात अजित पवार यांनी जयस्वाल यांना खडे बोल सुनावले. तेव्हापासून ते कमालीचे अस्वस्थ आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या पूर परिस्थितीच्या पाहणीसाठी पवार आले असता त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस कार्यकर्त्यांना वेळ न देता ते कांग्रेसचे खासदार धानोरकर व अपक्ष आमदार जोरगेवार यांच्या घरी गेले. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला नाही. त्यामुळे हा पूर पाहणी दौरा होता की काँग्रेसचा कार्यक्रम होता असेच सर्वत्र चर्चा होती.

पवारांच्या या वागण्याने दीपक जयस्वाल दुखावल्या गेले असून त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा वेळ नसेल तर त्या पक्षात राहून काय उपयोग, येत्या २ दिवसात पुढील राजकीय भविष्याबाबत निर्णय घेणार, असे जयस्वाल यांनी माध्यमांना सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांना संपर्क साधला आम्ही जयस्वाल यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे, काही महिन्यात चंद्रपूर मनपाच्या निवडणूका होणार आहे.