scorecardresearch

“काँग्रेसची विचारसरणी आदर्श, मात्र नेते नालायक”, माजी आमदार अशोक शिंदेंनी संताप व्यक्त करीत काँग्रेसला ठोकला रामराम

माजी आमदार अशोक शिंदे यांनी आज काँग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर केला. काँग्रेसची विचारसरणी आदर्श आहे, मात्र नेते नालायक आहे, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Ashok Shinde quit Congress
माजी आमदार अशोक शिंदेंनी संताप व्यक्त करीत काँग्रेसला ठोकला रामराम (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

वर्धा : शिवसेना सोडून दीड वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते, माजी आमदार अशोक शिंदे यांनी आज काँग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर केला. काँग्रेसची विचारसरणी आदर्श आहे, मात्र नेते नालायक आहे, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

भूमिका मांडताना शिंदे म्हणाले की, पक्षात प्रवेश घेण्यापासून ते आजपर्यंत मला काँग्रेस नेत्यांचा वाईट अनुभव आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यावेळी मला उपाध्यक्षपद देण्याचे कबूल केले होते. त्याचा अद्याप पत्ता नाही. काँग्रेसची सदस्य नोंदणी मजबुतीने केली म्हणून मी प्रदेश समिती सदस्य झालो. मेहरबानी नाही. विविध कार्यक्रम घेतले. कामे केली. पण काँग्रेसची सत्ता असूनही निधी मिळत नव्हता. सुनील केदार, रणजीत कांबळे, चारुलता टोकस व अन्य नेत्यांनी भ्रमनिरास केला. यांना गट मोठा करायचा आहे. पक्षाचा जनाधार नाही. सतत दुसऱ्याचे खच्चीकरण करण्यात यांना आनंद मिळतो. एकाकडे गेलो की दुसरा रुसतो. यांनी जिव्हारी लागणारी वागणूक मला दिली, अशी भावना शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविली.

हेही वाचा – यवतमाळ: फुलपाखरू पकडून देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांचा दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार

हेही वाचा – गडचिरोली: नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला; पुरुन ठेवलेली शक्तीशाली स्फोटके जप्त

समुद्रपूर काँग्रेस तालुका अध्यक्ष अविनाश जामुनकार व अन्य सातशे कार्यकर्त्यांसह काँग्रेस सोडत असल्याचे त्यांनी जाहीर केले. ते म्हणाले की, शेखर शेंडे, प्रमोद हिवाळे, इक्रम हुसेन, शैलेश अग्रवाल या काँग्रेस नेत्यांनी आपली समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण निर्णय पक्का झाला आहे. ज्या पक्षात सन्मान नाही, गटबाजीचा बोलबाला आहे, वरिष्ठ समजूत घेत नाही, अशी काँग्रेस आपणास न्याय देऊ शकत नाही, असेही शिंदे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 14:28 IST

संबंधित बातम्या