शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट बाहेर पडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे एकदम बदलली. भाजपच्या पाठिंब्याने शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर गट विस्ताराचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. काही संघटना, पक्षाचे नेते त्याची भेट घेऊ लागले. दुसरीकडे ऊध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासाठी पावले उचलली आहेत.

या पार्श्वभूमीवर पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी विधान परिषद सदस्य प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे पुत्र व पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे होते. यावेळी राजकीय व सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याचे कवाडे यांच्याकडून कळवण्यात आले. कवाडे यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा होता. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यावर त्यांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेतली हे येथे उल्लेखनीय.

Milind narvekar to join bjp?
पुढील लक्ष्य मिलिंद नार्वेकर! ठाकरे गटाला चितपट करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांकडून खास रणनीती?
DCM Devendra Fadnavis On Congress
“मोदी हे महायुतीचं इंजिन, तर राहुल गांधींच्या ट्रेनचं…”; देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर निशाणा
Sharad Pawar Wardha tour
वर्धा : शरद पवार यांच्याकडे काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी, पवार म्हणाले…
Heena Gavit nandurbar
नंदुरबार – धुळ्यात भाजप उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रवादीची नाराजी