घरात मैत्रिणीसह खेळत असलेल्या चार वर्षीय भाचीवर मावसमामाने लैंगिक अत्याचार केला. ही घृणास्पद घटना कळमन्यात उघडकीस आली. विष्णू (२८) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चार वर्षीय मुलगी ही आईसह राहते. तिची आई कळमना मार्केटमध्ये काम करते. तिच्या घराशेजारी तिचा मामा विष्णू हा राहतो. तो अविवाहित असून विकृत मानसिकतेचा आहे. १७ एप्रिलला सकाळी ११ वाजता चार वर्षीय मुलगी १० वर्षीय मैत्रिणीसह खेळत होती. दरम्यान विष्णू हा घरी आला. त्याने दुसऱ्या मुलीला २० रुपये दिले आणि दुकानातून बिस्किट आणायला पाठवले. त्यानंतर विष्णूनेे मुलीवर लैंगिक अत्याचार केला. काही वेळानंतर ती मुलगी परतली. तिला मुलगी रडताना दिसली. तिने कारण विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला.

हेही वाचा >>>वर्धा: दारूची लत सुटण्यासाठी घेतली जडीबुटी, थोड्याच वेळात…

दोन्ही मुली कुटुंबियांना सांगतील, ही भीती विष्णूला होती. त्यामुळे त्याने दोघीनाही जीवे मारण्याची धमकी दिली आणि घरून निघून गेला. मुलींनी घरी गेल्यानंतर कुटुंबियांना सांगितले. मुलीच्या आईने कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.