गडचिरोली : मागील ४८ तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या भामरागड शहराचा जिल्हा मुख्यालयपासून पुन्हा एकदा संपर्क तुटला आहे. संपूर्ण जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून ८ मार्ग बंद झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… आजपासून पावसाच्या पुन्हा जोरधारा; मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात प्रमाण अधिक

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभर अतिवृष्टी होत असल्याने पूरस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात देखील रविवारपासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गोदावरी, प्राणहिता आणि पर्लकोटा ह्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पर्लकोटा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागडशी संपर्क तुटला आहे. दुसरीकडे मेडीगड्डा धरणाचे ७० दरवाजे खुले करण्यात आल्याने सिरोंचा तालुक्यातील नदीकाठावरील गावात पाणी शिरण्यास सुरवात झाली आहे. असाच पाऊस कोसळत राहिल्यास या भागातील काही गावांतील नागरिकांचे स्थलांतर करावे लागेल.

हेही वाचा… नागपुरात सकाळपासूनच मुसळधार पावसाची हजेरी

बंद असलेले मार्ग गडचिरोली-गुरवाळा, माडेमुल-रनमुल,चांदाळा-कुंभी,धानोरा-सोडे,पेंढरी-पाखांजुर,साखरा-कारवाफा,लाहेरी-बिनागुंडा,आलापल्ली -ताडगांव-भामरागड.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli flood eight roads to bhamragad are flooded contact loss asj
First published on: 12-09-2022 at 09:35 IST