लोकसत्ता टीम

गडचिरोली : धनगरांना आदिवासींमधून आरक्षण देण्यात येऊ नये यासह विविध मागण्या घेऊन सकाळी दहा वाजतापासून गडचिरोली शहरात आदिवासी समाजाने चक्काजाम आंदोलन सुरू केल्याने पूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. यावेळी भेट देण्यासाठी आलेले भाजप आमदार डॉ. देवराव होळी यांचा आंदोलकांनी चांगलाच पाणउतारा केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Uran, JNPA port, workers protest, Nhava Sheva Port Workers' Union, wage contract, bonuses, cafeteria allowance, George Committee recommendations, vacant posts, salary demands, project victims,
उरण : धो- धो मुसळधार पावसात जेएनपीए कामगारांचे प्रशासना विरोधात आंदोलन
Bhumiputra contract workers, ONGC,
ओएनजीसीतील भूमिपुत्र कंत्राटी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात, प्रकल्पग्रस्त नागाव, चाणजे आणि केगाव ग्रामपंचायतींची आक्रमक भूमिका
Gold prices, Budget, Gold prices fall,
अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात आपटी, हे आहेत आजचे दर
ganesh naik criticizes cm eknath shinde says hidden brokers active in state government
दलालांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन; जनतेत योग्य संदेश जात नसल्याची गणेश नाईकांची टीका
BJP state executive meeting, Balewadi, pune, police force deployed
भाजप कार्यकारिणीच्या बैठकीसाठी एक हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त, बालेवाडीत आज बैठक
mahavitaran latest marathi news
महावितरण ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यातील ग्राहकांना २७.७८ कोटी देणार..झाले असे की…
Sangli, criminals, police, Sangli police,
सांगली : पोलिसांच्या झाडाझडतीत ६० गुन्हेगारांवर कारवाई
Thane Municipal Commissioner information about the measures to solve the traffic jam
मुख्यमंत्र्यांचे शहर अडकले वाहतूक कोंडीत, पालिका अधिकाऱ्यांना जोरबैठका सुरू

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील आदिवासींमध्ये सरकारबद्दल प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे वेळोवेळी आंदोलनातून ही अस्वस्थता बाहेर येत आहे. अशात धनगर आरक्षणाचा प्रश्न अधिक चिघळत असताना त्यांना आदिवासींमधून आरक्षण देण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे रविवारी जिल्हाभरातील दहा हजारावर आदिवासींनी गडचिरोली शहरात एकत्र येत चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. धानोरा मार्गावरून मोर्चा काढत आंदोलकांनी इंदिरा गांधी चौकात येत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजप आमदार डॉ. देवराव होळी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली असता आदिवासी आंदोलकांनी भाजपविरोधी घोषणा देत आमदारांचा पाणउतारा केला. सोबतच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदविला.

आणखी वाचा-खरीप हंगामाची पैसेवारी जाहीर, पीक उत्पादनात लक्षणीय घट येण्याची चिन्हे

काही दिवसांपूर्वी आमदार होळी यांनी मोबाईलवर झालेल्या संभाषणात आदिवासी तरुणाला तुझ्या एका मताने निवडून येतो का, असे म्हटल्याची ध्वनिफीत प्रसारित झाली होती. हा विषय देखील या आंदोलनात काढण्यात आला त्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी आमदारांना चांगलेच सुनावले. दरम्यान, जिल्ह्यातील तीन आमदार आणि एक खासदार आंदोलनस्थळी येत नाही तोपर्यंत चक्काजाम सुरूच राहणार असे आंदोलकांनी जाहीर केल्याने शहरातील पूर्व वाहतूक व्यवस्था दोन तासांपासून ठप्प पडली आहे.