गडचिरोली : साडेपाच लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवादी आणि एका समर्थकाला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली पोलिसांच्या सी-६० पथकाने महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील जंगल परिसरात ही कारवाई केली. काजल ऊर्फ सिंधू गावडे (२८ , रा. कचलेर ता. एटापल्ली) व गीता ऊर्फ सुकली कोरचा (३१ , रा. रामनटोला, ता. एटापल्ली ) असे महिला नक्षलवाद्यांची नावे आहेत, तर पिसा पांडू नरोटे (रा. झारेवाडा ता. एटापल्ली ) असे समर्थकाचे नाव आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याचा उद्देशाने गडचिरोलीमध्ये नक्षलवादी सक्रिय झाले आहेत. त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली असून मागील तीन महिन्यांपासून नक्षलविरोधी अभियान गतिमान करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील पिपली बुर्गी पोलीस ठाणे हद्दीतील जवेली जंगलात दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना सी- ६० पथकाने ७ एप्रिलला ताब्यात घेतले, यासोबतच गिलनगुडा जंगल परिसरातून समर्थकाच्या मुसक्या आवळणल्या. या तिघांवरही महाराष्ट्र सरकारने तब्बल साडेपाच लाखांचे बक्षीस ठेवले होते. २०२० मध्ये कोपर्शी-पोयारकोटी जंगल परिसरात चकमक झाली होती. त्यात एक अधिकारी व एक जवान शहीद झाले होते. या चकमकीत काजल गावडे व गीता कोरचा या दोघींचा प्रत्यक्ष सहभाग होता, असे चौकशीत निष्पन्न झाले.

Notice to eight more people by District Collectors in Zhadani case
सातारा: झाडानी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आणखी आठजणांना नोटीसा, २० जून रोजी उपस्थित राहण्याचे आदेश
files missing, tuljabhavani temple,
तुळजाभवानी मंदिरातील ५५ संचिका गायब, घोटाळा दडपण्याचा प्रयत्न, जिल्हाधिकार्‍यांचेही दुर्लक्ष
Passenger, Hungary,
मुंबई : बनावट व्हिसाद्वारे हंगेरीला जाणाऱ्या प्रवाशाला पकडले
RSS chief Mohan Bhagwat remarks on BJP manipur conflict
मोहन भागवतांच्या कानपिचक्या संघ आणि भाजपामधील अंतर वाढल्याच्या निदर्शक आहेत का?
Loksabha Election 2024 Mayawati Bahujan Samaj Party uttar pradesh
मायावतींच्या बसपाला उतरती कळा; मतदारांनी का नाकारलं?
naxals kill man on suspicion of being police informer
छत्तीसगड, तेलंगणमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाया; पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नागरिकाची हत्या
Gadchiroli, Naxal supporter,
गडचिरोली : दीड लाखांचे बक्षीस असलेल्या कट्टर नक्षल समर्थकास अटक
karad municipality marathi news
कराड: ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने ‘टाळेठोक’, गाढवावरून धिंड आंदोलन स्थगित

हेही वाचा…“नेतृत्वहीन असल्याने काँग्रेसमध्ये निर्णय क्षमता नाही,” ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा डागली तोफ; म्हणाले, “काँग्रेस नेत्यांचे विरोधकांशी…”

काजल ऊर्फ सिंधू गावडे ही २०१२ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षीच नक्षलवादी चळवळीत दाखल झाली. प्लाटुन क्र. ५५ मध्ये सदस्य या पदावर भरती होऊन सन २०१९ पर्यंत कार्यरत होती. २०१९ मध्ये कंपनी क्र. ४ मध्ये बदली होऊन सन २०२० पर्यंत सदस्य पदावर होती. त्यानंतर ती डिव्हीजनल कमिटीत सदस्य पदावर होती. तिचा सात चकमकींत सहभाग होता. कनेली वपुसेर साखरदेव जंगल परिसरात शस्त्रे जमिनीत पुरुन ठेवल्याचाही आरोपही तिच्यावर आहे. तर गीतावर पाच गुन्हे असून ती २०१८ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सप्टेंबर २०२० पर्यंत कार्यरत होती. सप्टेंबर २०२० मध्ये माड एरीयामध्ये बदली होऊन ती सदस्य पदावर आतापर्यंत कार्यरत होती. चकमकीच्या तीन गुन्ह्यांत तिचा सहभाग होता. एका पोलीस जवानाच्या व निरपराध नागरिकाच्या हत्येचाही तिच्यावर आरोप आहे. समर्थक पिसा नरोटे वर देखील खूनासह विविध गुन्हे दाखल होते. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.