नागपूर : एका युवकाने बलात्कार केल्याने गर्भधारणा होऊन एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला. शेजाऱ्याची तक्रार करण्यासाठी तरुणी बाळ घेऊनच पोलीस ठाण्यात पोहोचली. ही घटना अजनी पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. योगेश कमलदेव नाडे (२५), रा. रहाटेनगर, टोळी असे आरोपीचे नाव आहे. ऑटोचालक योगेश  गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्या ऑटोने ये-जा करणाऱ्या पीडित १७ वर्षीय युवतीशी त्याची ओळख झाली.  त्यातूनच त्यांचे सूत जुळले. त्याने तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. १७ वर्षांची असतानाच गर्भवती झाल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या. युवतीच्या घरी गर्भवती असल्याचा संशय येण्यापूर्वीच तिने लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, वय कमी असल्यामुळे आता आपण फसणार या भीतीपोटी आरोपीने मुलीला वर्धा येथील काकाच्या घरी  लपवून ठेवले. तेथील डॉक्टरांशी संपर्क साधून गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही योजना फसली. तरुणीला २५ मे २०२० रोजी मुलगी झाली. त्याने बाळासह तिला स्वत:च्या घरी नेले. मात्र आईवडिलांनी तिला  स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे तिने पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.