गोव्यातील सत्ता कायम ठेवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर पक्षाने सोपविलेली मोहीम त्यांनी फत्ते केली आहे. दिवसभर भाजपासाठी इतर छोटय़ा पक्षांशी सल्लामसलत करून गडकरी यांनी मनोहर पर्रिकर यांच्यासाठी केंद्रीय नेतृत्त्वाकडून परवानगी घेऊन गोव्यात भाजपचाच मुख्यमंत्री होईल, याची खात्री करून त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी पूर्णपणे यशस्वीपणे पार पाडली आहे.

गोव्यात भाजपला मिळालेले संख्याबळ बघता सरकार स्थापन करणे शक्य नव्हते. मात्र छोटे पक्ष आगोव्यात भाजपला मिळालेले संख्याबळ बघता सरकार स्थापन करणे शक्य नव्हते. णि अपक्षांची मोट बांधून सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने नितीन गडकरी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरल्यामुळे गोव्यात गडकरी खऱ्या अर्थाने किंगमेकर ठरले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी ४० सदस्यीय विधानसभेत काँग्रेस १७ जागा मिळवून मोठा पक्ष ठरला, तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपने १३ जागा जिंकल्या. सत्ता स्थापनेसाठी २१ जागांची आवश्यकता असताना ९ सदस्यांचा पाठिंबा मिळविणे, हे भाजपसमोर मोठे आव्हान होते. नितीन गडकरी शनिवारी दिवसभर दिल्लीत होते. सत्तेची समीकरण जुळविण्यासाठी गडकरी यांच्याकडे गोव्याचे निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली. गोवा निवडणुकीची जबाबदारी ही गडकरींकडेच होती. त्यासाठी त्यांनी निवडणुकीपूर्वी व्यूव्हरचनाही केली होती. मात्र, निवडणुकीचे निकाल विपरित लागले. त्यामुळे गडकरीच आता गोव्याची सत्ता पुन्हा राखू शक तील, असा विश्वास पक्ष नेतृत्त्वाला वाटला आणि त्यामुळेच त्यांना पुन्हा गोव्यात पाठविण्यात आले. गडकरी शनिवारी रात्रीच गोव्यात पोहोचले. रात्रभर त्यांनी सत्तेची समीकरण मांडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अपक्ष आमदारांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांना पुन्हा गोव्यात आणून त्यांना मुख्यमंत्री केले तरच पाठिंबा देऊ, अशी अपक्षांनी अट घातल्यामुळे गडकरी यांनी केंद्रात असलेल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली आणि त्यांच्याकडून हिरवा सिग्नल मिळाल्यावर सत्तेची समीकरणाला आणखी गती आणत अपक्षाची मोट एकत्र बांधण्यात गडकरींना यश आले.

दरम्यान, निवडणुकीच्या काळात गोव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुभाष वेलिंगकर यांनी वेगळी चूल मांडून गोवा सुरक्षा मंच स्थापन करून उमेदवार उभे केले, त्यामुळे मतविभाजनामुळे भाजपचे उमेदवार निवडून आणणे हे गडकरींसमोर मोठे आव्हान होते. एकीकडे नागपूर महापालिकेसह राज्यातील दहा महापालिकेच्या निवडणुका असताना गडकरी यांनी महाराष्ट्र सांभाळत असताना गोव्यात अनेक जाहीरसभा घेतल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून गोव्यात भाजपाला १३ जागा मिळाल्या. मात्र, सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ मिळाले नसल्यामुळे गडकरी यांनी रविवारी दिवसभर गोव्याचा किल्ला लढवून मोहीम फत्ते केली.