नागपूर: सोन्याचे दर मध्यंतरी जीएसटी व मेकिंग शुल्क वगळून एक लाखाहून वर विक्रमी उंचीवर गेले होते. त्यानंतर आता हे दर हळूृ- हळू कमी होत आहे. दरम्यान मागील चार दिवसांत सोने- चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी नागपुरात सोमवारी (२८ जुलै २०२५) सोने- चांदीचे दर काय होते? याबाबत आपण जाणून घेऊ या.
सोने- चांदीचे दर विक्रमी उंचीवर गेल्यानंतर आता त्यात घट होतांना दिसत आहे. नागपुरात सोन्याचे दर १३ जूनला जीएसटी व मेकिंग शुल्क वगळून एक लाखावर होते. त्यानंतर दरात घसरण होत आहे. मागील आठवड्याभरात या दरात सातत्याने घट होतांना दिसत असून सोमवारी दर आठवड्याभरातील निच्चांकीवर होते. नागपुरातील सराफा बाजारात २४ जुलै २०२५ रोजी पावसाळ्याच्या दिवसांत सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९९ लाख ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९२ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७७ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार ७०० रुपये होते.
दरम्यान हे दर चार दिवसानंतर २८ जूलैला २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ९८ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९१ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७७६हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार रुपये नोंदवले गेले. दरम्यान हे दर २८ जूलैला मागील आठवड्याभरातील निच्चांकी पातळीवर आले आहे. नागपुरात २३ जूलैला सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम १ लाख ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९३ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७८ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६५ हजार ६०० रुपये होते. दरम्यान नागपुरात २४ जुलैच्या तुलनेत २८ जुलैला सोन्याचे दर २४ कॅरेटमध्ये प्रति दहा ग्राम १ हजार रुपये, २२ कॅरेटमध्ये ९०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ८०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ७०० रुपयांनी कमी झाले आहे.
चांदीच्या दरातही घसरण
नागपुरातील सराफा बाजारात मेकिंग व जीएसटी शुल्क वगळता चांदीचे दर प्रति किलो २४ जुलैला १ लाख १५ हजार ५०० रुपये होते. हे दर २८ जुलैला प्रति किलो १ लाख १३ हजार ८०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे २४ जुलैच्या तुलनेत २८ जुलैला नागपुरात चांदीचे दर प्रति किलो १ हजार ७०० रुपये घसरले आहे.